सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज प्रियांका चोप्रा, मेरी कोम आणि गीता गोपीनाथ यांच्यासारख्या भारतीय महिला घडल्या. सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि सगुणाबाई क्षीरसागर यांची मैत्री हा आपल्या सर्वांसाठी एक धडा आहे. महिला एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या तर त्याचा परिणाम दिसून येतो.”, असे खासदार पूनम महाजन म्हणाल्या. रीटा राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीबाई फुले : हर लाइफ, हर रिलेशनशिप्स, हर लेगसी’ या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकावर मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटर्नल क्वालिटी ॲश्युअरन्समध्ये (आयडॉल) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खासदार पूनम महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सावित्रीबाई फुलेंबद्दल हे उद्गार काढले.
हेही वाचा..
एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!
सर्वात मोठी पनौती कोण?’, सीटी रवी यांची राहुल गांधींवर खणखणीत टीका!
‘कॉलेज आवारात पंतप्रधानांच्या प्रतिमेसह सेल्फी पॉइंट उभारा!’
अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’
सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट व वारसा आणि त्यांचा १९ व्या शतकावर असलेला प्रभाव तसेच त्यांचे योगदान हा या चर्चासत्राचा विषय होता. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या पाचच राज्यांना सावित्रीबाई फुलेंच्या कार्याविषयी माहिती आहे. आपण त्यांची कथा संपूर्ण देशात आणि जगाला सांगितली पाहिजे, असे रीटा राममूर्ती गुप्ता म्हणाल्या. पत्रकार स्वाती खंडेलवाल जैन यांनी या चर्चासत्राचे संचालन केले. पत्रकारिता विभागाच्या दैवता पाटील यांनी १९ व्या शतकातील भारतातील परिस्थितीवर प्रकाश टाकला आणि पुढे झालेल्या चर्चासत्रातून सावित्री फुले यांचे कार्य प्रेक्षकांसमोरल उलगडले.
या कार्यक्रमासाठी २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचे इन-चार्ज संचालक डॉ. संतोष राठोड म्हणाले, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे चरित्र हा प्रेरणास्रोत आहे. त्या ज्या आव्हानांना सामोऱ्या गेल्या आणि त्या आव्हानांवर त्यांनी ज्या प्रकारे मात केली यावर या चरित्रात प्रकाश टाकण्यात आला आहे.” मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले, “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला आणि त्यांचा समाजावर प्रचंड प्रभाव राहिला. महिला सबलीकरणासाठी त्यांनी सातत्याने काम केले हे आपल्याला माहीत आहेच. त्यांचे चरित्र इंग्रजी भाषेत आल्याने आता त्यांचे कार्य अधिक वाचकांपर्यंत पोहोचेल, अशी मला खात्री आहे.”