डाव्या आघाडीला केरळच्या वायनाडमधून कॉंग्रेसची हकालपट्टी करायची असल्यामुळे तिथे भारतीय कामुनिस्ट पक्षाने वायनाड लोकसभा जागेसाठी ॲनी राजाला उमेदवारी देण्यात आली आहे. ते लोक कॉंग्रेसच्या युवराजांना दूर राहण्याचा सल्ला देत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तिरूअनंतपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कॉंग्रेस आणि त्यांच्या इतर कम्युनिस्ट पक्षाने आपल्या कुटुंबाला सत्तेत आणले. देशावर राज्य करू दिले. त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचे कल्याण हे भारतीयांच्या कल्याणापेक्षा श्रेष्ठ आहे. केरळच्या सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा आघाडीचा सहकारी असलेल्या सीपीआयने लोकसभा निवडणुकीत चार जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा..
अयोध्या, श्रीनगरमध्ये होणार ‘महाराष्ट्र दर्शन’
अजित पवारांकडून सभागृहात महिलांची ताकद दर्शवणारी शेरो शायरी
ब्रिटनस्थित गुंडाने केली नफेसिंग राठींची हत्या?
शरीर कमावण्यासाठी तरुणाने चक्क गिळली नाणी, लोहचुंबक!
याबद्दल ॲनी राजा म्हणाले, राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढू नये. त्यांनी इंडी आघाडी कशी मजबूत होईल, याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी रणनीती आखावी, असेही त्या म्हणाल्या. याबद्दल सीपीआय नेत्या वृंदा करात म्हणाल्या, कॉंग्रेसच्या नेत्यांनी डाव्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवावी. त्यांनी वायनाडमधून लढू नये. त्यांना जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल तर त्यांनी त्यांच्या विरोधात लढणे आवश्यक आहे. डाव्यांशी लढून काय उपयोग असेही करात म्हणाल्या.