सरसंघचालकांनी हिंदू समाजाला वेळीच केलं सावध

सरसंघचालकांनी हिंदू समाजाला वेळीच केलं सावध

संघ हा हिंदू समाजाचा भाग असल्याने आणि संघ हिंदू समाजाचं नेतृत्व करत असल्याने हा उत्सव संपूर्ण हिंदू समाजासाठी महत्वाचा असतो. दरसाल प्रमाणे पूजनीय सरसंघचालकांनी हिंदू समाजाचं उद्बोधन केलं. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ३०० वी जयंती वर्ष संघ साजरा करणार आहे असं सरसंघचालकांनी सांगितलं, सोबतच जनजातीय समुदायाचे मार्गदर्शक, रक्षक भगवान बिरसा मुंडा यांची आठवण केली. नोव्हेंबर महिन्यात भगवान बिरसा मुंडा यांची १५० जयंती येणार आहे त्याच पार्शवभूमीवर हि आठवण करण्यात आली. या नंतर मात्र सरसंघचालकांनी मुख्य विषयाला हात घातला.
जगभरातल्या घडामोडी विशेष म्हणजे भारतावर परिणाम करणाऱ्या घडामोडींवर संघाचं किती बारीक लक्ष असतं हे तुम्हांला आज सरसंघचालकांचं भाषण ऐकून समजेल. आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना त्यांचा या उद्बोधनातून मुख्य विषय कोणता पोचवायचा आहे हे समजावं म्हणुन हा छोटासा प्रयत्न

पू.सरसंघचालकांनी इस्रायल आणि हमास दरम्यान सुरु असलेल्या युद्धाच्या मुद्द्यावरून सुरुवात केली… ते म्हणाले “मध्यपूर्वेत हमासने इस्रायलबरोबर पुकारलेल्या संघर्षाची व्याप्ती कुठपर्यंत पसरेल, याची चिंता सर्वांनाच भेडसावत आहे. आपल्या देशातही आशा-आकांक्षांसह आव्हाने आणि समस्याही उभ्या ठाकल्या आहेत. या विजयादशमीच्या भाषणात परंपरेने या दोन्ही गोष्टींवर शक्य तेवढी तपशीलवार चर्चा केली जाते.पण आज मी केवळ काही आव्हानांवर चर्चा करणार आहे.”

यावेळी उद्बोधनात कोणतेही आढेवेढे न घेता भारतावर परकीय महासत्तांची वाकडी नजर पडलेली आहे, ती पूर्वीपासूनच आहे याची आठवण करून दिली. यावेळी त्यांनी अमेरिका चीन आणि युरोप कडे बोट न दाखवता हिंदूंना जगभर काय चालू आहे आणि भारतात काय होऊ घातलं आहे, हेच सांगितलं आहे. भारत आपल्या आशा-आकांक्षां पूर्ण करण्यासाठी एका गतीने निघालेला आहे ती गाठलेली गती तो कायम राखणार आहे, गेल्या काही वर्षांत भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून साऱ्या जगात दिसतो आहे. भारताची आत्मरक्षणाची, आर्थिक उन्नतीची, स्वयंपूर्णतेची क्षमता दिवसेंदिवस रुंदावत आहे.
पुढे सरसंघचालक म्हणतात, “भारताला जगात असे महत्त्व प्राप्त होत असताना, त्याला खीळ घालणाऱ्या, निहित स्वार्थ असलेल्या शक्तींचे असणेही काहीसे अपेक्षितच आहे.

यासोबतच भारत समस्त विश्वाच्या कॉन्शियस चा केंद्रबिंदू असल्याने तो त्याचा स्वार्थ रहित कल्याण करण्याचा स्वभाव सोडू शकत नाही.” अर्थात भारताने निस्वार्थपणे अनेकवेळा आत्महितला बाजूला सारुन इतर देशांचं कल्याण केलं आहे. त्यामुळे असा देश वैभवशाली झाला तर निस्वार्थपणे कोणतीही सुप्त इच्छा न बाळगता इतर देशांचे कल्याण करणारा देश या जगात उभा राहील, ज्याने बहुतेक स्वार्थी महासत्तांच राज्य चालणार नाही किंवा स्वार्थ पूर्ण होणार नाही. यासाठी सरसंघचालक म्हणतात, “उदारमतवादी, लोकशाही प्रकृतीच्या आणि जागतिक शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या देशांची ही बांधिलकी त्यांच्या सुरक्षा आणि स्वार्थाचा प्रश्न निर्माण होताच अंतर्धान पावते.” असे कोणते देश आहेत जे एकत्र उदारता, लोकशाही जागतिक शांततेचा नगारा वाजवत फिरतात? यात अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आणि युरोपियन देश येतात. त्यात ते विशेषकरून अमेरिकेला लक्ष्य करत होते. सरसंघचालकांनी अशा सत्ता बेकायदेशीर आणि हिंसक मार्गांनी इतर देशांवर हल्ला करतात, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना उलथून टाकण्याचं काम करतात हे स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यांनी यासाठी बांगलादेशच्या हिंसात्मक आंदोलन ते तख्तापालट याचं उदाहरण देत सांगितलं कि, हे महासत्ता देश त्यांच्या टार्गेटवर असलेल्या देशात एखाद्या लहानश्या मुद्द्याला भडकावून, जनभावना उसळून त्या देशाची राख करतात. या सोबत त्यांनी बांग्लादेशमध्ये अमेरिकेच्या मूर्खपणाने हिंदू समाजाचा नाहक बळी गेला आहे हे सुद्धा सुचवलं आहे, त्यांच्या सुरक्षिततेची काळीज केली आहे. त्यांनी भाषणात बांगलादेश आणि इतर देशांतून भारतात होणाऱ्या घुसखोरीवरही भाष्य केलं आहे. सोबतंच बांग्लादेशात कशा प्रकारे पाकिस्तानशी हातमिळवणी करून परमाणू शस्त्रांनी रोध करण्याची योजना सुरु आहे हे सांगून वेळीच सावध केलं आहे.

सरसंघचालकांनी सांगितलं आहे कि अमेरिका आणि इतर स्वार्थी सत्तानि भारतावर अप्रत्यक्षपणे राज्य करण्यासाठी पावलं उचलायला सुरु केलं आहे. तुम्हांला आठवत असेल तर मी माझ्या मागच्या एका लेखात अमेरिकेने भारताच्या राजकारणात, विरोधीपक्षात केलेली घुसखोरी समजावली होती. या सर्व स्वार्थी महासत्तांची किंवा विचारांची हत्यारं किंवा प्रेरणा ‘डीप स्टेट’, ‘वोकिज़म’, ‘कल्चरल मार्क्सिस्ट’ अश्या सर्व गोष्टी आहेत. वास्तविकपणे हे सर्वच भारताच्या सांस्कृतिक परंपरांचे स्वयंघोषित शत्रू आहेत. भारताची सांस्कृतिक मूल्ये, परंपरा आणि जे काही उदात्त किंवा मंगल मानले जाते त्याचा संपूर्ण नाश हीच या समूहाच्या कार्याची पद्धती आहे.

हे शत्रू एखाद्या देशावर हल्ला कसे करतात? तर सर्वात आधी त्या देशाच्या संस्थानात शिरकाव करून त्यावर ताबा मिळवतात, भारतात शिक्षण संस्था, विद्यापीठ, संशोधन संस्था, बौद्धिक संवाद माध्यमं, आणि मीडिया या सर्व ठिकाणी हा डिप्स्टेट, वोकीजम, मार्क्सिसमचा शिरकाव फार पूर्वीच झाला आहे. अशा वेळी ते भारतीयांच्या विचारांत महासत्तांच्या इशाऱ्या प्रमाणे प्रदूषण करू शकतात. ते भारतीयांना भ्रमात टाकू शकतात आणि असं केल्याची उदाहरणं देखील आहेत. समाजात एकत्र राहणाऱ्या, कोणताही घटकाच्या वास्तविक किंवा कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या विशिष्ट मागणी, गरज किंवा समस्या यांच्या आधारे वेगळे करण्यासाठी या माध्यमातून वेगवेगळी अभियान राबवली जातात. आंदोलन, चर्चा, मोर्चे, आणि हिंसा या माध्यमातून समाजाचं विभाजन करणं हीच त्यांची मोड्स ऑपरेंडी आहे. मग ज्या घटकाला समाजापासून वेगळा केला त्याला आक्रमक बनवलं जातं, पर्यायाने महासत्तांच्या हिशोबाने एखाद्या देशात शांती आणि समृद्धी नांदते किंवा भंग केली जाते. अशा पद्धतीच्या महासत्तांच्या हल्ल्याला संघचालकांनी मंत्रविप्लव असा शब्द वापरला आहे. शब्द आम्हांला आवडला आम्ही कायम वापरणार आहोत.

यासोबतच त्यांनी या जंजाळापासून मुक्तीसाठी मार्गही सांगितला आहे. सरसंघचालक म्हणाले कि आपले राष्ट्रीय जीवन सांस्कृतिक एकात्मता आणि श्रेष्ठ सभ्यतेच्या भक्कम पायावर उभे आहे. आपले सामाजिक जीवन उदात्त जीवनमूल्यांनी प्रेरित आणि पोषित आहे.त्यामुळे अशा मंत्रविप्लव क्रियांना थांबवण्यासाठी आपल्या सांस्कृतिक जीवनदर्शन आणि राज्यघटनेने दिलेल्या मार्गावर आधारित लोकतांत्रिक योजना बनवण्याची गरज आहे. एक सशक्त विमर्श उभा करून वैचारिक आणि सांस्कृतिक प्रदूषण पसरवणाऱ्या या कारस्थानांपासून समाजाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे.
यावरून त्यांनी एकप्रकारे हिंदू समाजातील प्रत्येकाला हिंदूंच्या मनातील, विचारांतील प्रदूषण दूर करण्याची जवाबदारीच दिली आहे.

हा झाला एक मुद्दा, दुसरा म्हणजे सरसंघचालकांनी हिंदू समाजाच्या सण-समारंभावेळी होणाऱ्या हल्ल्यांवरही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी गणेश विसर्जनावेळी झालेल्या दगडफेकीच्या घटनांची चर्चा केली, अशा घटना होत असताना सुरक्षा दलांनी लगेचच जाऊन घटना निवळण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे, पण अशावेळी सुरक्षा दल येईपर्यंत आपला बचाव आपण करण्याची हिंदू समाजाने जवाबदारी घ्यावी अशी त्यांची भूमिका आहे. तो हिंदूंचा संविधानाने दिलेला आत्मरक्षणाचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे अर्थ. त्यामुळे मी त्यावर अधिक काही सांगणार नाही. सोबतच हिंदू समाजातील विविध घटकांच्या नेतृत्वाने एकत्र येऊन आपापल्या लोकांची आव्हानं समस्या एकमेकाला सांगून आपसांत सोडवून घेणं अर्थात एका समाजाने दुसऱ्याची मदत करणं या गोष्टीकडे त्यांचा रोख होता.

हा सर्व अट्टाहास कशासाठी? हिंदूंचे संघटन करण्यासाठी, हिंदूंना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी, एकदा हिंदू समाज सुसंघटित आणि सामर्थ्यशाली झाला तर आपल्याकडे डोळे वटारून बघण्याची कोणत्याही महासत्तेची टाप होणार नाही.
या सोबतच सरसंघचालकांनी क्लायमेट चेंज, संस्कार जागरण, नागरी अनुशासन, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार अश्या सर्व विषयांना हात घातला. आणि शेवटच्या दोन ओळीत त्यांनी आपल्या संपूर्ण उद्बोधनाची दिशा सांगितली.

हिन्दू भूमि का कण कण हो अब, शक्ति का अवतार उठे,
जल थल से अम्बर से फिर, हिन्दू की जय जय कार उठे
जग जननी का जयकार उठे

Exit mobile version