मविआच्या नेत्यांना निवडणुकीपुरते संविधानाची आठवण, शपथविधी सोहळ्यात सिद्ध केले!

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मविआच्या नेत्यांना निवडणुकीपुरते संविधानाची आठवण, शपथविधी सोहळ्यात सिद्ध केले!

राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. आता नवनिर्वाचित आमदारांचा शपथ सोहळा पार पडत आहेत. यासाठी विशेष अधिवेशन सुरु आहे. ७ आणि ८ डिसेंबर या दरम्यान शपथ सोहळा पार पडत आहे, तर ९ डिसेंबर रोजी विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या शपथ सोहळ्यात ७ डिसेंबर रोजी १७३ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. मात्र मविआच्या आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. या भूमिकेवरून भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मविआवर हल्ला चढवत टीका केली.

चंद्रशेखर बावनकुळे ट्वीटकरत म्हटले, मविआकडून संविधानाचा अवमान. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले.

ते पुढे म्हणाले, विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

हे ही वाचा : 

अबू आझमी यांचे ठाकरेंशी फाटले

शरद पवार महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत!

त्या ईव्हीएमची शपथ तुला…

राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात होणार?

Exit mobile version