‘ह्या’ राज्यात देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा

‘ह्या’ राज्यात देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा

तुम्ही नुकताच KGF हा चित्रपट पाहिला असेल ज्यात संपूर्ण लढा सोन्याच्या खाणीबाबत होता. चित्रपटात अभिनेता यश म्हणजेच ‘रॉकी भाई’ सोन्याची सर्वात मोठी खाण शोधतो आणि इतके सोने तयार करतो की सगळेच थक्क होतात. आता KGF प्रमाणेच भारतात देखील सोन्याचा साठा समोर आला आहे.

बिहारमध्ये सर्वात मोठा सुवर्ण साठा असल्याचे समोर आले आहे. अनेक शतकांपासून देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा येथे लपवून ठेवला जात असल्याचे सांगितले जात आहे. बिहार सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. बिहार सरकारने जमुई जिल्ह्यात देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा शोधण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या सर्वेक्षणानुसार, जमुईमध्ये सुमारे २२२.८८ दशलक्ष टन सोन्याचा साठा आहे. ज्यामध्ये ३७.६ टन खनिज समृद्ध धातूचा समावेश आहे. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनोसरखे या भागात सोन्याचा साठा आढळून आला आहे. राज्याचे खाण आणि भूगर्भशास्त्र विभाग जमुईमधील सोन्याच्या साठ्याच्या शोधासाठी GSI आणि राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) एजन्सीशी सल्लामसलत करत आहेत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी साधणार अनाथ मुलांशी संवाद

‘रोहित पवारांनी असले धंदे बंद करावेत’

पंतप्रधान मोदींनी सांगितली ही योग दिनाची थीम

स्टार्टअप्समध्ये भारताची सेंचुरी; युनिकॉर्नची संख्या १०० वर

डिसेंबर २०२१ मध्ये जमुईमध्ये उत्खननादरम्यान सोन्याचा साठा सापडला होता. सोनो गावात हे उत्खनन सुरू होते. गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, ते लहानपणापासून पाहत आले आहेत की आठ किमीच्या परिघात मातीमध्ये एक चमकणारा धातू दिसतो. यापूर्वी १५ वर्षांपूर्वी कोलकाता येथील एक पथकही येथे सर्वेक्षणासाठी आले होते, तेव्हाही या भागातील सोन्याचा साठा निश्चित झाला होता.

Exit mobile version