संपूर्ण मुंबईत गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. त्यातील बोरीवली पूर्व येथील एकता सार्वजनिक मंडळ म्हणजेच उपनगरचा राजा. छोट्या स्वरूपात स्थापन झालेल्या मंडळाचा राजापर्यंत हा प्रवास नेमका कसा होता. मूर्तीची स्थापना, इतिहास, मूर्तीकार, सामाजिक एकता, विसर्जन मिरवणूक याविषयी जाणून घेऊया.
उपनगरच्या राजाची स्थापना झाली ते वर्ष होते १९८३. चार बिल्डिंगच्या मधोमध हा बाप्पा छोट्याशा रुपात स्थानापन्न झाला. गणेशाची स्थापना झाल्यानंतर सामाजिक कार्यक्रम, नाटक, विभागातील नागरिकांसाठी स्पर्धा घेतल्या जात होत्या. हा प्रवास तब्बल चोवीस वर्षे चालला. अब तक चोवीस नंतर रौप्य महोत्सवी वर्षाबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात विचार घुमू लागले, की मोठ्या मूर्तीची स्थापना करावी. एकमताने मोठी मूर्ती बसवायचे ठरले. परंतु बोलणे सोपे असते प्रत्यक्षात आणणे हे कठीण होते. चार फूटी मूर्तीवरून २५ फूटी मूर्ती बसवायची तर अडचणी येणार होत्या. मूर्ती वसाहतीतून घेऊन जाऊन चार बिल्डिंगच्या मधोमध ही मूर्ती बसवायची हे सर्वात खडतर आव्हान होते. परंतु मंडळाने हे आव्हान सहज पेलले. परंतु जुन्या जागेचा विसर मंडळाला अजूनही पडलेला नाही. अजूनही त्या जागेवर छोटी मूर्ती वाजत-गाजत आणून त्या जागेची विधिवत पूजा करून नंतर मोठ्या मंडपात स्थापन्न होते.
मोठी मूर्ती स्थानापन्न करण्याअगोदर जाहीर सभा घेतली गेली. मोठ्या मूर्तीचा अट्टासाह का? असा प्रश्न मिटींगमध्ये उपस्थित केला गेला. त्यात असे ठरले की बरीच मंडळं मोठी मूर्ती स्थापन करतात, गणेशभक्तांना ती आवडते. अनेक भक्तांना बोरीवलीहून लालबाग-गिरगावात गणपती पाहण्यासाठी जाण्यास अडचणी निर्माण होतात. हा विषय प्राधान्याने आल्यानंतर मोठी मूर्ती बसवण्याचे एकमताने ठरले गेले.
मग प्रश्न आला मोठी मूर्ती कोणत्या मूर्तीकाराकडून बनवायची. मूर्ती लालबागमधील विजय खातू यांच्याकडे घडवावी असा निर्णय झाला. ही मोठी मूर्ती लालबागहून सात वर्षे ट्रॉलीवरून खेचत मंडपात आणलेली आहे. हे आव्हान सोपे नव्हते. सकाळी सुरुवात व्हायची मंडपात याला रात्र व्हायची. लालबागहून येताना अनेक अडचणी निर्माण झाल्या. रस्ते, ब्रीज, वायर बाजूला करणे या अडचणी पार करत बाप्पा पुढे मार्गस्थ होत असे. प्रत्येक वर्षी हे मंडळ नवनवीन गोष्टी शिकत होता. वायर बाजूला सारण्यासाठी काठी पाहिजे, ब्रीजचे मोजमाप घेतले पाहिजे अशा अनेक गोष्टीची तयारी केली गेली. कला नगरचा ब्रीज नवीन तयार झाला असताना, हा अडचण निर्माण करेल असे वाटत होते, परंतु मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या फ्लायओव्हरचे परफेक्ट मोजमाप घेऊन अंदाज बांधला होता. त्या वेळेस बाप्पाची प्रभावळ अगदी काठोकाठ २ इंचावरून पार करून हा ब्रीज बाप्पाने पार केला होता. त्या वेळस एका प्रसिद्ध वर्तमानपत्राने हेडिंग केले होते, उपनगराचा राजा ‘बाप्पा पास हो गया’. त्यावेळेस हा बाप्पा ‘उपनगराचा राजा’ या नावाने नावारूपाला आला. एकता सार्वजनिक मंडळाला आता उपनगराचा राजा ही उपाधी मिळाली होती.
बाप्पाची मूर्ती लालबागहून बोरीवलीला आणताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. मुख्य अडचण ही वाहतुक कोंडीची होती. पोलिसांवरील ताण, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, मूर्तीचे पावित्र्य जपता यावे असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यानंतर मूर्तीकार विजय खातू यांना ही मूर्ती जागेवरच घडवण्याची विनंती करण्यात आली. खातूनेही ही विनंती तात्काळ मान्य केली. स्वतः विजय खातू येऊन या मूर्तीचे पाय कसे असावे, आशीर्वादाचा हात कसा असावा, सोंड कशी असावी, पायाची पोझिशन कशी असावी या सर्व गोष्टींकडे लक्ष घालून मूर्ती बनवून घ्यायचे. लालबागचा राजा आणि उपनगराचा राजा हे दोनच बाप्पा आहेत, ज्यांच्या चरणी भक्तांना डोके टेकता येते.
विजय खातू यांचे निधन झाल्यानंतर त्यांची मुलगी रेशमा खातू यांनी ही मूर्ती घडवण्याची जबाबदारी स्विकारली. दहा वर्षे ही मूर्ती आता जागेवर आकार घेते आहे. उत्सवाची छोटी मूर्ती बोरीवलीतून आणली जाते. या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते.
लातूरचा किल्लारी भूकंपात मंडळाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मदत केली होती. जव्हार, वाडा येथील आदिवासी भागातील शाळांना शैक्षणिक उपक्रमातील वस्तू दिल्या जातात. दानपेटीतील पैशांचा उपयोग या उपक्रमासाठी केला जातात. इर्शाळगड दुर्घटनेवेळीही मंडळाचे कार्यकर्त्यांनी जाऊन मदत केली होती.
गणेशोत्सावाच्या आठ दिवस अगोदर गणेशाचा मूखदर्शन सोहळा आयोजित केला जातो. याआधी अनेक उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. गेल्यावर्षीपासून महिला सशक्तीकरण विडा मंडळाने उचलला आहे. स्थानिक महिलांना उपाध्यक्षपासून अनेक पदे देण्यात आली. काही कार्यक्रम त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत.
गेल्या वर्षी नऊ दिवस गणपतीचे अभिषेक केले गेले. गणपतीच्या आरतीचा मान गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अशा लोकांना दिला गेला, ज्यांनी कोविडकाळात काम केले. सफाई कामगार, रिक्षावाले, पोलिस यांना आरतीचा मान दिला जातो.
आणि दिवस उजाडतो तो गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा. गणपती विसर्जनाला निघाला ही आता मीडियाची हेडलाइन झालेली आहे. विसर्जन मिरवणूकीत पारंपारीक वाद्यात बाप्पाची मिरवणूक निघते. विसर्जनाची मिरवणूक साधारण २.३० वाजता राजेंद्र नगरच्या ब्रीजवर येते. तिथे एक गृहस्थ दरवर्षी दुपारचे अल्पोपहार देतात न चुकता. त्यांचा हा उपक्रम कित्येक वर्षे सुरू आहे. सहा वाजता बाप्पा एस.व्ही. रोडला पोहोचतो. एलटी रोड सुरू होतो. एलटी रोडपासून अनेक भक्त विसर्जन मिरवणूकीत सामिल होतात. गोराईला जाणाऱ्या राजमार्गावरून विसर्जनासाठी बाप्पा पोहोचतो. उपनगरच्या राजाला पाहण्यासाठी अलोट गर्दी लोटलेली असते. उपनगरच्या राजाच्या विसर्जनासाठी बोरीवलीतील एका इसमाने आपली बोट दिलेली आहे. या बोटीतूनच बाप्पाचे विसर्जन केले जाते.
एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
उपनगरचा राजा कार्यकारी समिती २०२४-२०२५
उत्सव प्रमुख –
ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय वैद्य,
माननीय श्री. विजय केळुसकर,
अध्यक्ष – श्री. राजन सावंत
उपाध्यक्ष – श्रीमती मनिषा परब, रेखा बोराडे, श्री हनुमंत सावंत
सरचिटणीस – श्री. मिलिंद कोळवणकर
सहचिटणीस – श्री.मिथीलेश सावंत, श्रीमती कांचन सार्दळ, श्री. विक्रांत पाटील
खजिनदार – श्री.आकाश टिम्मन
सह खजिनदार – श्री. हेमल ठक्कर, श्रीमती रूपल भाटिया, श्रीमती हिना पटेल
कार्याध्यक्ष – श्रीमती सीमा सावंत,श्रीमती रेखा जाधव, श्री. समीर नारकर, श्री.संस्कार पटेल
कार्यकारणी सदस्य
श्री. संकेत जाधव. श्री. समीर बांबार्डेकर, श्री.स्वप्निल जाधव, श्री. निखिल पाटील, श्री बिपिन सावंत, श्री.सचिन आसले, श्री.अनिकेत वारंग, श्री.साहिल ठाकूर, श्री. विपुल झोरे, श्री.पार्थ कोळवणकर,श्री.जिगर भाटिया,श्री.संतोष देवरुखकर, श्री.श्रेयस सावंत, श्री.प्रणेश सावंत,श्री.पार्थ नागवदरीया, श्री
सचिन पाटील, श्री. मंदार सुर्वे, श्री.साईराज मयेकर, श्री.विशाल राजपूत, श्री.संतोष जाधव, श्री.निहाल परमार, श्रीमती वंदना कोंडाळकर, श्री. वैभव परब, श्री.निखिल वडके, श्री.मृगेन शहा, श्री.आशिष करकेरा, श्री. कल्पेश पेडणेकर, श्री.श्रेयस पय्यर
ज्येष्ठ मार्गदर्शक
श्री. सचिन वगळ, श्री. प्रवीण मुरुडकर,श्री. संदीप पाडलोस्कर, श्री.सतीश धुरी, श्री.बाळ धुरी,श्री.सुनील झोरे,श्री. योगेश पाडलोस्कर, श्री.आनंद कोळवणकर, श्री. रमेश म्हापसेकर,श्री.मनोज कोळवणकर,श्री.दीपक गोसावी, श्री. प्रशांत मळीक,श्री. श्याम पंडित,श्री.अविनाश मुंज, श्री. राजू दळवी
मीडिया पार्टनर
श्री. हिमेश जोशी