केरळची शोकांतिका; मला नर्स व्हायचे होते, पण आता मी इसीसची दहशतवादी आहे

'द केरला स्टोरी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

केरळची शोकांतिका; मला नर्स व्हायचे होते, पण आता मी इसीसची दहशतवादी आहे

बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. मला नर्स व्हायचे होते पण आता मी इसीसची दहशतवादी आहे, या वाक्याने या टीझरची सुरुवात केली आहे. या वाक्यावरूनच केरळमधील ३२,००० महिलांच्या तस्करी-धर्मांतराची हृदयद्रावक क्रूरता दाखवली जाईल. युट्युब वर शेअर केलेला टीझर १ मिनिट १९ सेकंदाचा आहे.

या टीझरमध्ये एका महिलेची कथा दाखवण्यात आली आहे जिने नर्स बनण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु तिचे घरातून अपहरण केले जाते आणि आता इसीसची दहशतवादी म्हणून अफगाणिस्तानात तुरुंगात टाकले जाते. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये अदा शर्मा बुरखा घातलेली दिसत आहे. ती म्हणते, “माझे नाव शालिनी उन्नीकृष्णन होते. मला नर्स बनून लोकांना मदत करायची होती. आता मी फातिमा बी आहे. एक इसीस दहशतवादी,जी अफगाणिस्तानमधील तुरुंगात बंद आहे. मी एकटी नाही. माझ्यासारख्या आणखी ३२,००० मुलींचे धर्मांतर करून त्यांना सीरिया आणि येमेनमध्ये पुरण्यात आले आहे.

 

देशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या कथा कॅमेराबद्ध करण्याच्या प्रयत्नांचा दुसरा भाग म्हणून ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी या कथेवर अनेक महिने संशोधन केले असून या कामात त्यांना विविध सामाजिक संस्थांनीही मदत केली आहे. ही एका मानवी शोकांतिकेची कथा आहे जी प्रेक्षकांना हादरवून सोडते. केरळ राज्यात बेपत्ता झालेल्या ३२ हजार महिलांमागील घटना या चित्रपटातून उलगडण्यात आल्या आहेत.

द केरळ स्टोरी खरी, न्याय्य आणि सत्यकथा

हा चित्रपट केरळला हादरवून सोडणाऱ्या घटनांची अतिशय खरी, न्याय्य आणि सत्यकथा असल्याचा दावा द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी केला आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीनुसार, २००९ पासून केरळ आणि मंगळुरूमधील सुमारे ३२,००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे इस्लाम धर्म स्वीकारण्यात आले आहे. आणि त्यापैकी बहुतेक सीरियामध्ये तुरुंगात आहेत. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात या महिलांच्या या कटामागील सत्य आणि वेदना दाखवण्यात आल्या आहेत असे विपुल शाह यांनी सांगितले.

Exit mobile version