बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट शुक्रवार, ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले असून या चित्रपटाने चांगला गल्ला कमावला आहे. तत्पूर्वी, या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने नवा विक्रम रचला होता. देशभरात ३२ हजार तिकिटांची विक्री होऊन हा चित्रपट वर्षातील पाचव्या क्रमांकाचा जास्त आगाऊ बुकिंग केलेला चित्रपट ठरला आहे.
‘द केरळ स्टोरी’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने ७.५ कोटींची कमाई केली होती. आठवड्याच्या अंती हा चित्रपट आणखी कमाई करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यानुसार ‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर ३५.९२ कोटींची कमाई केली होती. तर, सोमवारी या चित्रपटाने जवळपास १०.०७ कोटींची कमाई केली आणि मंगळवारी या चित्रपटाने १०.९९ कोटी रुपये कमावले. अवघ्या पाच दिवसांत या चित्रपटाने एकूण ५६.७१ कोटींचा गल्ला जमावला आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट दुसऱ्याच दिवशी करमुक्त करण्याची घोषणा केली. तसेच उत्तर प्रदेशातही हा चित्रपट करमुक्त करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.
हे ही वाचा:
“महाराष्ट्रात दंगल घडवण्याला उद्धव ठाकरे जबाबदार”
इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला!
ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लैंगिक शोषण प्रकरणात ५० लाख डॉलर्सचा दंड
‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.