त्या २६ मुलींचे आयुष्य ‘द केरळ स्टोरी’सारखेच

निर्माते विपुल शहा यांनी पत्रकार परिषदेत केले स्पष्ट

त्या २६ मुलींचे आयुष्य ‘द केरळ स्टोरी’सारखेच

‘ द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या तब्बल ३२ हजार मुलींच्या धर्मांतराच्या दाव्यामुळे या चित्रपटाभोवती वादाचे मोहोळ उठले. चित्रपटात अशा तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली. याबाबत प्रथमच निर्माता विपुल शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन अशा २६ मुलींना समोर आणले.पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ’२६ मुली इथे आहेत आणि आमच्यासारख्या आणखी तरुणी आहेत, असे या तरुणींनी स्वत: सांगितले आहे. तसेच, एका संस्थेकडे मदतीसाठी सात हजार महिला आल्या असल्याचे सांगितले. आम्ही या संदर्भात १००हून अधिक महिलांची भेट घेतली आहे.

आमच्या चित्रपटात तीन मुलींची गोष्ट सांगण्यात आली असली तरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला अशा हजारो मुलींच्या कहाण्या तुमच्यापर्यंत आणल्या आहेत,’ असे विपुल शहा म्हणाले.त्यांनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्या आणि चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकांवर टीका करणाऱ्या प्रसारमाध्यांवरही तोंडसुख घेतले. ‘प्रसारमाध्यमांनी आमच्या हेतूवर संशय व्यक्त करून आमच्यावर टीका केल्यामुळे आम्हाला खूप दु:ख झाले. आम्ही तर कुणीच नाही. परंतु एवढ्या मुलींच्या आयुष्याचे नुकसान होत आहे. त्यांना साथ न देऊन, या चित्रपटाला खोटे सिद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात.

हे ही वाचा:

रणरणत्या उन्हात ५५ वर्षांहून अधिक वयाच्या पोलिसांना तैनात करू नये

नाद एकच; बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील !

‘द केरळ स्टोरी’ बंगालमध्ये प्रदर्शित होणार

भारतात AMAZON करणार अब्जावधी गुंतवणूक

हे किती योग्य आहे, हे तुम्ही स्वत:च आरशात पाहा आणि उत्तर द्या,’ असे ते म्हणाले. तर, ‘सात हजार हा आकडा या संस्थेचा आहे. मात्र आम्ही लवकरच आणखी आकडे आणून सगळ्याचा खुलासा करू. या ३२ हजारांचाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.’द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपला मुद्दा पुढे करत म्हटले की, ‘दहशतवाद केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आहे. पण इतर देशांमध्ये दहशतवादाविरोधात विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आहेत. दुर्दैवाने आपल्या देशात दहशतवादाला धर्म नसतो असे म्हटले जाते, पण केरळचा प्रश्न आला की लगेच लोक धर्माबद्दल बोलायला लागतात.

मला वाटते की या चित्रपटाने खरोखरच इस्लाम धर्माच्या लोकांची सेवा केली आहे कारण या धर्माचा गैरवापर होत आहे. आपण धोक्यात आहोत हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक देशभक्त भारतीयाने चित्रपट पाहिलाच पाहिजे.’या पत्रकार परिषदेत केरळच्या आर्य विद्या समाजाच्या २६ मुलीही उपस्थित होत्या, त्या धर्मांतरानंतर पुन्हा आर्य समाजात आल्या आहेत. त्याचे ब्रेनवॉश करून धर्मांतर कसे झाले हे त्याने सांगितले.आर्य विद्या समाजाची स्थापना 1999 साली झाली. या आश्रमाच्या माध्यमातून धर्मांतरित तरुण-तरुणींना पुन्हा सनातन धर्मात आणण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही या आश्रमाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी आश्रमाच्या बांधकामासाठी ५१ लाख रुपयांची मदत केली.

Exit mobile version