बहुचर्चित असा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात १९९० च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची कथा मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच, चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. याचा परिणाम म्हणजे चित्रपटाने दोन दिवसात केलेली कमाई. देशभरात निवडक शो असूनही विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दोन दिवशी चांगली कमाई केली.
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये ९.५५ कोटी ते १०.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.५५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी सहा ते सात कोटींची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटासाठी ६७४ स्क्रीन्स लावल्या आहेत. भारतात ५६१ स्क्रीन्स लावण्यात आले आहेत तर परदेशात ११३ स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. अमेरिकेत सर्वाधिक ६० स्क्रीन्स आहेत. तर ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमध्ये प्रत्येकी १८ स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. जर्मनीमध्ये ९ स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बनवण्याचा खर्च १४ कोटी आला असून प्रोडक्शन बजेट १२ कोटी होते तर प्रिंट आणि जाहिरातीचा खर्च २ कोटी इतका आहे.
हे ही वाचा:
शरद पवार दाऊद संबंध? राणे बंधूंवर गुन्हा
ओदिशामध्ये आमदाराच्या गाडीने २२ भाजपा कार्यकर्त्यांना चिरडलं
सोनिया, राहुल, प्रियांका राजीनामा देणार? बातमीने खळबळ
विद्यार्थ्याच्या फी संदर्भात विचारणा केल्यावर पालकाला मारहाण
विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, अनुपम खेर, प्रकाश बेलवाडी, मिथुन चक्रवर्ती, भाषा सुंबळी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांनी काम केले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सत्य समोर येईल, असा दावा विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे अनेक व्हिडीओ सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.