26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'द काश्मीर फाइल्स' ने मोडला दंगल विक्रम, बाहुबली-२ चा विक्रम मोडण्याच्या मार्गावर

‘द काश्मीर फाइल्स’ ने मोडला दंगल विक्रम, बाहुबली-२ चा विक्रम मोडण्याच्या मार्गावर

Google News Follow

Related

विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केवळ आठ दिवसात या चित्रपटाने शंभर कोटींहून अधिक कमाई करून दंगल चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ११ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आठ दिवसात या चित्रपटाने मोठा पल्ला गाठला असून या चित्रपटाची सातत्याने कमाई चालू आहे.

आणखी हा चित्रपट विक्रम मोडणार असल्याचे बोलले जात आहे. प्रेक्षकच या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर लोक इतरांनाही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेरित करत आहेत. हा चित्रपट काश्मीरमधून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे.

चित्रपट समीक्षक, तरण आदर्श यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ ह्या चित्रपटाने इतिहास रचला आहे, असे ट्विटद्वारे म्हटले आहे. ट्विटवर ते म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटाने आठव्या दिवशी १९.१५ कमाई केली आहे. तर बाहुबली-२ या चित्रपटाच्या १९.७५ कोटींचा विक्रम लवकरच हा चित्रपट मोडणार असल्याचे दिसत आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने भारतात ११६.४५ कोटी रुपयांची कमाई केली. तरी हा आकडा वाढत जाणार आहे.’

हे ही वाचा:

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांनी घेतली शपथ

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

…. म्हणून मविआ नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही!

‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट इतर भाषांमध्येही डब केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते. एवढेच नाही तर या चित्रपटाची ज्यादा बुकिंगही मोठ्या प्रमाणात होत आहे. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये, सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. हा चित्रपट सुरवातीला ६३० स्क्रीनवर दाखवला जात होता. तर दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट तब्बल ४ हजार स्क्रीन्सवर दाखवला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा