सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

भारतीय हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी

सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या संघाने प्रथमच ज्युनियर आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. दक्षिण कोरियाच्या संघाला नमवत भारताने हा विजय मिळवला. संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

अंतिम फेरीत भारतीय संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. दक्षिण कोरियाने यापूर्वी सर्वाधिक चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्येच होणार होती मात्र कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली. या स्पर्धेत भारताने दक्षिण कोरियावर २- १ असा विजय मिळवला. दक्षिण कोरियाने या स्पर्धेवरील वचर्स्व पाहता या अंतिम सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष होते. रोमहर्षक या सामन्यात एक- एक अशी बरोबरी असताना कोण जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष होते. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेत अखेरच्या क्षणी भारतीय संघातील खेळाडूने गोल करुन भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे ट्वीटवरुन कौतुक केले आहे. ट्विटरवर त्यांनी फोटो शेअर करत म्हटलं आहे की, ‘महिला हॉकी ज्युनियर एशिया कप २०२३ जिंकल्याबद्दल आमच्या युवा चॅम्पियन्सचे अभिनंदन. संघाने प्रचंड जिद्द, प्रतिभा आणि सांघिक कार्य खेळातून दाखवलं आहे. त्यांनी देशाला खूप अभिमान वाटेल असा इतिहास रचला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.’

दरम्यान या विजयानंतर हॉकी इंडियाने महिलांसाठी बक्षिस घोषित केले आहे. खेळांडूना प्रत्येकी दोन लाख रुपये मिळणार आहेत तर सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहेत.

Exit mobile version