राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.हास्यजत्रेतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद खांडेकर यांची देखील चर्चा झाली.अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला.प्रसाद खांडेकरांचा “एकदा येऊन तर बघा या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नाहीत, असा प्रश्न भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानसभेत मांडला.दरेकरांच्या प्रश्नाला उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, असा प्रकार घडत असेल तर कादेशीर कारवाई करू.
अधिवेशनामध्ये प्रवीण दरेकर म्हणाले की, ” अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा ८ डिसेंबरला ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट रिलीज होत आहे. पण काही बॉस लोकं आहेत, जे या मराठी सिनेमाला सिनेमागृह मिळवू देत नाहीत.”
हे ही वाचा:
करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित
मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!
केसीआर यांना धोबीपछाड देणाऱ्या काँग्रेसच्या रेवंथ रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्याबाबत आराखडा सादर करा
प्रवीण दरेकर यांचा हा मुद्दा ऐकल्यानंतर देवेंद्र फडणीस उत्तर देत म्हणाले, “प्रसाद खांडेकर हे गुणी कलावंत आहेत. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी गेली अनेक वर्ष लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यांच्या सिनेमाला जर सिनेमागृह उपलब्ध होत नसेल, तर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अभिनेता प्रसाद खांडेकराचा “एकदा येऊन तर बघा’
हास्यजत्रेतील अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, तेजस्विनी पंडित, ओंकार भोजने,विशाखा सुभेदार, वनिता खरात यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.