मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने केली होती. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पहिल्या सामन्यात मुंबईला पराभावाचा सांमना करावा लागला होता. ५ वेळा चॅम्पियन असलेला मुंबई इंडियन्स आपला दुसरा सामना २७ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. पण त्याआधीच संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा मुख्य फलंदाज आणि मधल्या फळीतील वादळी फलंदाज सूर्यकुमार यादव दुसऱ्या फिटनेस चाचणीतही नापास झाला आहे. या कारणामुळे आयपीएलमध्ये सूर्या उशीरा उगवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
हैदराबाद विरुद्ध सामन्यात खेळणार नाही
दुसऱ्या फिटनेस चाचणीनंतरही सूर्यकुमार यादवला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून खेळण्यासाठी क्लीन चिट मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी दुसरी फिटनेस चाचणी २१ मार्च रोजी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु दोनदा फिटनेस चाचणीत सूर्यकुमार यादव अनफिट असल्याचे बोलले जात आहे. टी-२० विश्वचषक समोर पाहता बीसीसीआय यादवच्या फिटनेसबाबत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही.
हेही वाचा :
आशियातील अब्जाधीशांच्या यादीत मुंबई नंबर वन
अमेरिकेत जहाज धडकून ब्रिज कोसळला
स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची कमाई ११ कोटी पार
विराट कोहलीचे टी-२० क्रिकेटमधील १०० वे अर्धशतक
सूर्यकुमार यादवला काही महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. सूर्याला हर्निया नावाच्या समस्येने ग्रासले होते. त्यांनी जर्मनीला जाऊन जानेवारीत शस्त्रक्रिया केली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला एक महिना लागू शकतो, असा अंदाज होता, पण आता तो मैदानाबाहेर राहून बराच काळ लोटलेला आहे.