इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ ची सुरुवात २२ मार्च रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्याने होणार आहे. या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावानंतर अनेक संघांच्या रचना आणि कर्णधारांमध्ये बदल झाले आहेत. सर्व संघ पुन्हा एकदा जगातील सर्वात प्रतिष्ठित टी२० लीग जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.
कुठे पाहू शकता आयपीएलचे सामने?
आयपीएल २०२५ चे सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहता येतील. हे सामने हिंदी, इंग्रजीसह विविध प्रादेशिक भाषांमध्ये देखील प्रसारित केले जातील. डिजिटल स्ट्रीमिंगबद्दल बोलायचे झाल्यास, जिओहॉटस्टारवर हे सामने थेट पाहता येऊ शकता.
सामन्यांचे वेळापत्रक
आयपीएल २०२५ मधील सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील. तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. डबल हेडर असलेल्या दिवसांत दुपारच्या सामन्यांचा वेळ दुपारी ३:३० वाजता असेल आणि नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल.
हंगामाचा कालावधी आणि सामने
आयपीएल २०२५ ची सुरुवात २२ मार्च २०२५ रोजी होईल आणि अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी खेळला जाईल. यंदाच्या हंगामात १० संघ आपापसात १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळतील.
विशेष म्हणजे, कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर उद्घाटन सामना होणार असून अंतिम सामना देखील याच ठिकाणी खेळला जाणार आहे.
उद्घाटन सोहळा
आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता ईडन गार्डन्समध्ये पार पडेल. यामध्ये प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल, अभिनेत्री दिशा पाटनी आणि इतर बॉलिवूड कलाकारांच्या आकर्षक परफॉर्मन्सचा समावेश असेल. हा सोहळा स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर आणि जिओहॉटस्टारवर थेट पाहता येईल.
नवे विक्रम आणि विक्रमवीर
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नवे विक्रम प्रस्थापित होतात. आतापर्यंत या लीगच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. २०१३ मध्ये त्याने ६६ चेंडूत नाबाद १७५ धावा फटकावल्या होत्या. याआधी, २००८ मध्ये ब्रेंडन मॅक्क्युलमने ७३ चेंडूत नाबाद १५८ धावा केल्या होत्या, जो आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वोच्च स्कोर आहे. भारतीय फलंदाजांमध्ये, केएल राहुलने २०२० मध्ये ६९ चेंडूंमध्ये नाबाद १३२ धावा करत सर्वोच्च भारतीय स्कोर नोंदवला होता.
हेही वाचा :
दिल्लीतील न्यायाधीशांच्या बंगल्याला लागलेल्या आगीनंतर सापडली बेहिशेबी रोकड
हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बदर खानच्या हद्दपारीला स्थगिती
लष्कराला मिळणार बळकटी; स्वदेशी प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम खरेदीला मंजुरी
‘पालकांनी तुमच्यासाठी घेतलेली मेहनत कधीही विसरू नका!’
गोलंदाजीच्या विक्रमांमध्ये युझवेंद्र चहलने आतापर्यंत सर्वाधिक २०५ विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमार (१८१ विकेट्स), सुनील नारायण (१८० विकेट्स) आणि रविचंद्रन अश्विन (१८० विकेट्स) यांना यंदाच्या हंगामात २०० विकेट्सचा टप्पा पार करण्याची संधी आहे.
सर्वाधिक सामने खेळण्याच्या विक्रमात महेंद्रसिंह धोनी (२६४ सामने), रोहित शर्मा (२५७ सामने) आणि विराट कोहली (२५२ सामने) या तिघांचे नाव आघाडीवर आहे.