… म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या दंडावर काळ्या फिती

दोन्ही देशांनी व्यक्त केले दुःख

… म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या दंडावर काळ्या फिती

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिप स्पर्धेचा थरार रंगला आहे. जगातील सर्व क्रीडा प्रेमींचे याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, हा सामना खेळताना दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हाताला काळी फीत बांधली आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताच्या ओडिशा राज्यात भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला तर एक हजाराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेटचा सामना सुरू होण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ओव्हल मैदानावर ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक मिनिटांचे मौन पाळत दोन्ही संघातील खेळाडूंनी दुःख व्यक्त केले. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू मैदानात दंडावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत. बीसीसीआयने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

हे ही वाचा:

बंगालमधील कोरोमंडल अपघातग्रस्तांना दोन हजारांच्या चलनी नोटांमध्ये मदत

कोल्हापूरमध्ये व्हाट्सऍपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा जणांना अटक

‘बीबीसीची करचुकवेगिरीची कबुली म्हणजे भारतविरोधी अजेंड्याला पाठिंबा’

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मल्टीमॉडेल विमानतळ असणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गेल्या १० वर्षांपासून भारतीय संघाने आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेली नाही. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मिळवली होती. तेव्हापासून भारतीय संघ आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० वर्षांचा दुष्काळ संपवणार का? याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version