मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!

पोलिसांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!

मुंबई मधील वरळीत हिट अँड रनची घटना घडली आहे. चार चाकी कारने दुचाकीवरील दाम्पत्याला फरफटत नेल्याने दुचाकी वरील महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघात झाला तेव्हा राजेश शहा गाडी मध्ये नव्हते. मात्र, त्यांचा मुलगा आणि कार चालक गाडीमध्ये होते. या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नखवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीनं धडक दिली. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. परंतु, या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र,
डॉक्टरांनी महिलेला तपासून मृत घोषित केलं. कावेर नखवा (वय ४५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

हे ही वाचा:

राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार

२३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. दुचाकीला धडक देणारी कार राजेश शहा यांच्या नावावर असल्याने त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. अपघातावेळी कारमध्ये राजेश शहा यांचा मुलगा मिहिर शाह आणि त्यांचा कार चालक दोघे होते. हे दोघेही अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version