जालन्यातील लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण स्थगित!

शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन सोडले उपोषण

जालन्यातील लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण स्थगित!

जालन्यातील वडीगोद्रीत मागील १० दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन आपले उपोषण सोडलं आहे. उपोषणाला स्थगित करत असल्याची माहिती स्वतः उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी दिली.

उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं पोहोचले. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्यास १२ जणांचा समावेश होता. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले. एक- दोन मागण्या सोडल्या तर बाकी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याची माहिती शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांना दिली. त्यानंतर हाके यांनी शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पित हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.

हे ही वाचा:

सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीला रवाना!

मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच बाबूंचे बुल्डोझरास्त्र!

‘राम वन गमन पथ’ आणि ‘कृष्ण पथ गमन’ प्रकल्प राज्यात वेग घेणार!

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना दोन दिवसीय भारत दौऱ्यावर!

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी जनतेला संबोधित करताना समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले. तसेच मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ”आम्ही कोणालाही धमक्या देत नाही. जमाना जानता हैं हम किसीके बाप से नहीं डरते. ते पुढे म्हणाले, मराठा समाजाला तुम्ही वेगळ आरक्षण द्या. आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला राहू द्या. लोकशक्ती सर्वात मोठी शक्ती आहे. आमच्यावर अन्याय होतोय, आम्ही कधी पर्यंत सहन करायचं.
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. जे गरीब, अशक्त आहेत त्यांना आरक्षण दिल पाहिजे.

मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधत मंत्री भुजबळ म्हणाले की, जातीवाद करणारे तिकडे बसले आहेत. त्यांना आरक्षण म्हणजे काही माहिती नाही. ते काय बोलतात त्यांनाच काही समजत नाही. त्यांनी माझ्याशी चर्चा करण्याअगोदर त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करावी, असे मंत्री भुजबळ म्हणाले. याबाबत आगामी पावसाळी अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार आहे. सगेसोयरेंचे आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे पूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले. तसेच ओबीसी बांधवाना आवाहन करत म्हणाले, तुम्ही कोणत्या पक्षात आहात याच्याशी मला काही देणं घेणं नाही परंतु, तुम्ही एकत्र येऊन मजबुतीने उभे राहिलात तर तुमचे आरक्षण टिकून राहील, संरक्षित राहील, असे मंत्री भुजबळ म्हणाले.

 

Exit mobile version