कोळशाच्या खाणीमुळे चक्क १०० फूट गाडले गेले घर

चंद्रपूरत खानकामामुळे पोकळी निर्माण होवून घर गाडला गेल.

कोळशाच्या खाणीमुळे चक्क  १०० फूट गाडले गेले घर

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. एक घर जमीनदोस्त झाले आणि १०० फूट खोल खड्ड्यात गाडले गेले. चंद्रपूरच्या घुग्गुस गावात स्थानिक रहिवाशी गजानन मडावी यांचे घर अचानक सुमारे १०० फूट जमिनीत गाडले गेले. आमराई गावात कोळशाच्या खाणी असून परिसराची भौगोलिक स्थिती व भूगर्भातील कोळसा खाणीतील पोकळी निर्माण होऊन, पुराचे पाणी घुसल्याने जमिनीतील हालचाली झाली व ही दुर्घटना घडल्यामुळे घर कोसळल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर परिसरातील पन्नासहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ‘वेकोलीच्या भूमिगत कोळसा’च्या खाणी आहेत. या घटनेनंतर भूवैज्ञानिक तज्ज्ञ आणि कोळसा खाणीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. सुरुवातीला घरात अचानक हादरे बसल्याने मडावी कुटुंबीय भयभीत होऊन घराबाहेर पडले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण घर १०० फूट जमिनीत गाडले गेले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे.

हे ही वाचा:

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. ‘वेकोलीच्या भूमिगत कोळसा’ या सरकारी मालकीच्या कंपनीच्या खाणकामामुळे या भागात घरे कोसळण्याच्या अनेक घटना वारंवार घडल्या आहेत. मात्र अशा प्रकारे घर १०० फूट जमिनीत गाडली गेल्याची ही पहिलीच घटना आहे. स्थानिक आमदार, तहसीलदार व पोलीस प्रशासन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने परिसरातील वीज खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version