नग्न धिंड प्रकरणातील मैतेई जमातीच्या आरोपीचे मैतेई महिलांनी जाळले घर

आरोपी हुउरेम हेरोदासचे नोंगपोक सेकमाईमधील घर जाळले

नग्न धिंड प्रकरणातील मैतेई जमातीच्या आरोपीचे मैतेई महिलांनी जाळले घर

मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढून सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावार व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपीला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने या आरोपीचे घर पेटवून दिले.

दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ बुधवार, १९ जुलै रोजी व्हायरल झाला. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ आणि ही घटना ४ मे २०२३ रोजीची आहे. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपीचं नाव हुउरेम हेरोदास असं आहे. हेरोदासला अटक झाल्यानंतर आणि तोच या घटनेचा करताकरविता असल्याचं समजल्यानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्यांनी त्याच्या घराला आग लावली आहे.

आरोपीचं घर नोंगपोक सेकमाई पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं. गुरुवारी संध्याकाळी शेजारीपाजारी एकत्र आले आणि त्यांनी हेरोदासचं घर पेटवून दिलं. विशेष म्हणजे हेरोदासच्या घराला महिलांनीच आग लावली. महिलांनी यावेळी संतप्त भावना व्यक्त करत आरोपी आमच्याचं समाजातील असला तरी अशा प्रकारच्या कृत्यांचं कदापि समर्थन करणार नाही, असं म्हटलं आहे.

हे ही वाचा:

एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार!

चार आरोपी कोण?

पोलिसांनी हेरोदास  याच्यासह युमलेमबम जीबान, खुनडोंगबम अरुन आणि निनगोमबम टोम्बा यांना अटक केली आहे. नोंगपोक येथील कमाई येथील हे रहिवासी असल्याची माहिती आहे. हेरोदासला येरीपुक बाजारातून अटक केली आहे. तर जीबान स्वत:हून पोलिसांना शरण आला. अरुण नोंगपोक सेकमाई आणि टोम्बा यांना कोंगबा येथून गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version