साऱ्या जगाचे लक्ष असलेली भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम अखेरच्या टप्प्यात आहे. ‘चांद्रयान- ३’ हे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान- ३ चे यश साजरे करणे ही घटना संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. या क्षणाचा साक्षीदार सर्वांना घरबसल्या होता येणार आहे.
चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सर्वांना घरबसल्या मोफत पाहता येणार आहे. बुधवार, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी लँडिंगची प्रक्रिया सुरू होणार असून त्याचबरोबर त्याचे थेट प्रक्षेपण सुरू केले जाणार आहे. टीव्हीवर डीडी नॅशनल या चॅनलवर प्रक्षेपण थेट पाहता येणार आहे. तर, मोबाईलवरही या क्षणाचे साक्षीदार होता येणार आहे.
मोबाईलवर चांद्रयानाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रो फेसबुक किंवा यूट्यूब चॅनलचा वापर करता येणार आहे. युट्यूबवर @isroofficial5866 या नावाने हे चॅनल असून इस्रोच्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन देखील हे प्रक्षेपण पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या यूट्यूब चॅनलवरही चांद्रयान- ३ चे लँडिंग लोकांना पाहता येणार आहे.
हे ही वाचा:
सेवा नाहीत; मग कामगार रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशाला?
विक्रोळीतील पालिका शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार
उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले
आता कार्लसनला चितपट करण्यासाठी प्रज्ञानंद झाला सज्ज
रशियाचे लुना- २५ ही मोहीम अयशस्वी झाल्यानंतर आता भारताच्या चांद्रयान- ३ कडे साऱ्या जगाचे लक्ष असणार आहे. चंद्राच्या दक्षिण भागात पोहचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. भारताच्या चांद्रयान-३ ने आंध्रप्रदेशातील श्री हरिकोटा येथून १४ जुलै यशस्वी उड्डाण केले होते. भारताचे चांद्रयान- ३ हे कमी खर्चात चंद्रावर उतरणार आहे. यासाठी इस्रोने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केला आहे. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो.