पंतप्रधान मोदींच्या ईशान्य दिल्लीतील एका रॅलीला भारतातील सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वँग यांनी हजेरी लावली.रॅलीनंतर त्यांनी सोशल मीडियावर रॅलीचे कौतुक करत याला धमाकेदार म्हणून संबोधले.सायमन वँग यांनी आपल्या ट्विटरवर रॅलीमधील पंतप्रधान मोदींचा फोटो शेअर केला.त्यांनी लिहिले की, माझ्या सहकारी मुत्सुद्यांसह जगातील सर्वात मोठी लोकशाहीची प्रक्रिया पाहण्यासाठी पहिल्या रांगेत बसण्याची संधी मिळाली, धमाकेदार!, असे त्यांनी लिहिलं आहे.
पंतप्रधान मोदींची रॅली पाहण्यासाठी अनेक प्रदेशी राजनयिकांचा समूह आला होता.सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वँग यांच्यासह नेपाळचे राजदूत शंकर पी शर्मा यांचाही यात समावेश होता.दिल्लीत एकाच टप्प्यात २५ मे रोजी मतदान होणार आहे.ईशान्य दिल्लीतुन भाजपने मनोज तिवारी यांना उभे केले आहे.मनोज तिवारी यांच्या प्रचाराकरिता पंतप्रधान मोदी आले होते.दरम्यान, मनोज तिवारी यांच्या विरुद्ध इंडी आघाडीकडून कन्हैया कुमार उभे आहेत.
हे ही वाचा:
दादरमधील मॅकडोनाल्डला बॉम्बस्फोटाची धमकी!
बहारिनमध्ये सैफुद्दीनचा हिंदू महिलेवर बलात्कार!
उत्तर भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा!
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले!
Front row seats w fellow diplomatic colleagues to watch the world’s largest democracy in action. Electrifying! Thank you @BJP4India, @vijai63 for the opportunity. – HC Wong@narendramodi pic.twitter.com/iEQKZKdtVV
— Singapore in India (@SGinIndia) May 18, 2024
रॅलीनंतर एएनआयशी बोलताना भारतातील नेपाळचे राजदूत शंकर पी शर्मा म्हणाले की, २० लोकांसह आम्ही रॅलीत सहभागी झाले, यामध्ये ६ राजदूत होते.ते पुढे म्हणाले की, दिल्लीची रॅली आम्ही पाहिली, ती जवळजवळ नेपाळसारखीच आहे.पण मला भारतात पहिल्यांदाच राजकीय जाहीर सभेला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.याचा मला अभिमान आहे.भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे सांगून ते म्हणाले की, निवडणुकींचे अनेक टप्पे पूर्ण झाले आहेत.भारत ही लोकशाहीची जननी आहे.म्हणूनच मी पंतप्रधान मोदींच्या रॅलीला सहभागी झालो, अन त्याचा मला अभिमान आहे, असे नेपाळचे राजदूत शंकर पी शर्मा म्हणाले.