पुण्यातील बावधन परिसरात बुधवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी एक खासगी हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमधून खासदार सुनील तटकरे प्रवास करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना घेण्यासाठीचं हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते अशी माहिती समोर आली आहे.
ऑगस्टा १०९ असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची ओळख पटली असून कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत सिंग अशी मृत वैमानिकांची नावे आहेत. तर मृत अभियंत्याचे नाव प्रीतम भारद्वाज असे आहे.
पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर दरीत कोसळल्यानंतर इंजिनने लगेच पेट घेतला. त्यामुळे स्फोट होऊन हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात घडला.
हे ही वाचा :
अशा ‘लाडीक मागण्या’ पवारांसमोरच का होतात?
सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!
तिरुपती लाडू प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत सरकारकडून एसआयटी चौकशीला ‘फुल स्टॉप’
लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!
सुनील तटकरे यांनी मंगळवारीच ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या या हेलिकॉप्टरने प्रवास केला होता. सुनील तटकरे मंगळवारी या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. तेथून ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. त्यानंतर हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून तटकरे मुंबईला आले. दरम्यान, आज सुनील तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने हवेत उड्डाण केले होते.