राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यापासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे इतर मद्याच्या विक्रीत चांगली वाढ झालेली आहे. तरी राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविण्याबाबत शासन स्तरावरून लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून या अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत देसाई मार्गदर्शन करत होते.
मंत्री देसाई पुढे म्हणाले की. पुणे विभागातील उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विभागातील सर्व गावांमध्ये हातभट्टी निर्मिती नष्ट करण्यासाठी काटेकोरपणे कारवाई करावी. शासन लवकरच हातभट्टी मुक्त गाव अभियान धोरण आणणार असून त्या अनुषंगाने एकाही गावात हातभट्टीची निर्मिती होणार नाही याची दक्षता घ्यावी. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी गावातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा असे निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा..
ई-केवायसी केलेल्या ३ लाख शेतकऱ्यांकरिता २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी वितरित
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ
२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल
पुणे विभागाला व त्यातील प्रत्येक जिल्ह्याला विभागाच्या वतीने महसूल वाढीचे जे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे ते उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपल्या जिल्ह्यात कोठेही अवैद्य मद्य निर्मिती व विक्री होणार नाही. तसेच बाहेरील राज्यातील मद्य अवैद्यपणे येथे येणार नाही व आपल्या जिल्ह्यातून इतर राज्यात अशा पद्धतीने मद्य विक्रीसाठी जाणार नाही याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी, नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी व चेक पोस्ट वरील पथकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश मंत्री देसाई यांनी दिले.