25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
घरविशेषचक्क प्रभादेवीत धर्मांतरणाचा हैदोस; ख्रिस्ती धर्मगुरूंकडून प्रवचन

चक्क प्रभादेवीत धर्मांतरणाचा हैदोस; ख्रिस्ती धर्मगुरूंकडून प्रवचन

भाजपाच्या नेत्यांनी केला पर्दाफाश

Google News Follow

Related

प्रभादेवी हा बहुतांश हिंदू वस्ती असलेला हा परिसर. आता हिंदूंच्या धर्मांतरणाचे जाळे थेट सामना ऑफिसच्या समोर असलेल्या विभागात पोहोचल्याचे दिसून येत आहे. प्रभादेवीतील कामगार नगर येथे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार येथे हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी ख्रिस्ती धर्मियांकडून प्रवचन केले जात असल्याचा आरोप भाजपा माहीम विधानसभेच्या अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी केलेले आहेत. जीवन ज्योती प्रार्थना सत्संग केंद्र असे हिंदू नाव धारण करणाऱ्या केंद्रात चक्क हिंदूंचे ब्रेन वॉश करून ख्रिस्ती धर्मांत धर्मातरित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा हा आरोप आहे.

अक्षता तेंडुलकर यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी थेट या प्रवचन केंद्र गाठले. या केंद्रात प्रवचन सुरू होते. प्रफुल आगरे हा व्यक्ती येथे प्रवचन देत होता. प्रवचन ऐकण्यासाठी आलो आहोत असे सांगून त्या प्रवचन ऐकण्यासाठी बसल्या. आपण हे प्रवचन लाइव्ह करू, असे बोलून त्यांनी ते लाइव्ह केले.

प्रफुल आगरे प्रवचनात सांगत होता, तु सच्चा परमेश्वर है. तु सबकुछ जानता है. आप देखो, आपको पता चलेगा. हालेलुया हालेलुया. ”हालेलुयाह” चा अर्थ असा आहे की ‘देवाची स्तुति करा।” हा एक हिब्रू शब्द आहे. यानंतर बसलेले सर्व हिंदू हालेलुया हा शब्द उच्चारताना दिसत आहेत.

त्यानंतर अक्षता तेंडुलकर यांनी प्रवचनकाराला विचारणा केली की, हे ख्रिश्चन आहेत की हिंदू. त्यावर त्यांनी हिंदू आहेत. मग तुम्ही इथे हे प्रवचन का घेता अशी विचारणा केली. त्यानंतर त्या प्रवचन करणाऱ्या माणसाने मी सुद्धा हिंदू आहे, असे प्रत्युत्तर केले. यावर अक्षता यांनी आपले देव नाहीत का? त्यानंतर अक्षता तेंडुलकर आणि तेथे जमलेल्या सेंटरमध्ये बायकांनी वादविवाद घातले.

स्थानिकांनी अक्षता तेंडुलकर यांच्याकडे या सेंटर विरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यांचे म्हणणे आहे की, इथे बेकायदा धर्मांतरण सेंटर सुरू आहेत. या सेंटरमधून हिंदूच्या देवीदेवतांबद्दल नकारात्मक बोलून हिंदूंचे ब्रेन वॉश केले जाते. हे सेंटर कामगार नगर १ प्रभादेवी येथे, सामना प्रेसच्या गल्लीमध्ये सुरू आहे. पूर्वी येथे शिवसेना शाखा होती. शिवसेना शाखा दुसरीकडे हलवल्यानंतर येथे कामगार नगरसाठी वेल्फेअर सेंटर सुरू करण्यात आले होते. येथे बालवाडी आणि इतर कार्यक्रम होत असतात. आता येथून न्हावा-शेवा प्रकल्पासाठी येथील झोपड्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परंतुअजूनही १५० ते २०० झोपड्यांमध्ये रहिवासी राहत आहेत. त्यात हा वेल्फेअर सेंटरचा समावेश आहे.

हे वेल्फअर सेंटर मेनरोडच्या आत असल्याने त्याचा फायदा घेऊन येथे हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ९९ टक्के हिंदू होते. त्यात महिलांचा समावेश जास्त होता. या वेल्फअर सेंटरमध्ये लाइव्ह कॅमेरे लावण्यात आले होते. हे कॅमेरे मिशनरी फंडिंगसाठी लावलेले होते, यांचे फंडिग हे विदेशातून येतात, त्यासाठी हे कॅमेरे लावलेले असतात. या सेंटरमध्ये ब्लॅक मॅजिक, हिप्नोटिझम केले जाते, असे अक्षता तेंडुलकर यांनी सांगितले.

दादरसारख्या जो हिंदूबहुल भाग आहेत, त्या विभागात आता हे प्रकार सुरू झालेले आहेत. हा भाग एन. एम. जोशी यांच्या हद्दीत येतो. त्याची तक्रार आणि रितसर पत्र पोलिसांना देण्यात आलेले आहेत. हे सेंटर चालवत असलेला प्रफुल आगरे याच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याद्वारे एफआयआरही करण्यात येणार आहे.

हेही वाचा :

क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज, पंजाब शिवसेनेचे नेते थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला

मनसे नेते प्रकाश महाजनांनी आव्हाड, संजय राऊतांना चांगलेच सुनावले!

जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच

‘कल्की २८९८ एडी’ चारशे पार!

या सेंटरमध्ये एक महिला किडनीच्या आजाराने ग्रस्त असताना आली होती. त्यावर प्रफुल आगरे यानी सांगितले की, तू डॉक्टरकडे जाऊ नकोस. तु प्रार्थनेला ये. आमचा परमेश्वर तुला ठिक करेल. त्या महिलेचे त्यानंतर निधन झाले आहे, असेही अक्षता तेंडुलकर यांनी सांगितले.

अक्षता तेंडुलकर यांनी लाइव्ह व्हिडिओ केल्यानंतर या व्हिडिओमध्ये असे दिसले होते की, या सेंटरमधील हिंदू महिलाच विरोध करताना दिसत होत्या. तुमचा देव आमचे काय करतो, असे शब्द वापरून भांडताना दिसत होत्या. आजूबाजूच्या रहिवाशांना तुम्ही पण या, आम्हाला असा फायदा झाला, आम्हाला पैसे दिलेत, आमच्या मुलांचे शिक्षण देत आहेत असे सांगितले जात होते. अशी विविध आमिषे सेंटरकडून देण्यात आली आहेत, असाही आरोप होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा