वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून

सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

वडिलांनी चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलेल्या मुलीसाठी गुजरात पोलीस आले धावून

सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा चालू आहेत. परीक्षा केंद्र, परीक्षा , हॉल तिकीट या सगळ्याचा तणाव विद्यार्थ्यांबरोबर पालकांना पण असतोच पण अशातच घाईत जर का कोणी आपल्या पाल्याला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडले तर ? तर अशीच एक घटना गुजरात मध्ये घडली आहे.पण तिच्या मदतीला चक्क एक पोलीस लाल दिव्याच्या गाडीचा उपयोग करत धावून आला आणि ती परीक्षा केंद्रावर सुखरूप पोहोचली. गुजरातच्या एका पोलिसाने तिला मदत केली आणि वैयक्तिकरित्या तिला २० किलोमीटर दूर असलेल्या योग्य परीक्षा केंद्रावर सोडले.

 

त्याचे झाले असे यासंदर्भात “आदर्श हेगडे” या ट्विटर वापरकर्त्याने गुरुवारी यासंदर्भात हि कहाणी शेअर केली आणि पोलिसासोबतचा चालत असलेल्या त्या मुलीसोबतचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. त्या मुलीच्या वडिलांनी तिला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर तिने तिचा रोल नंबर शोधला पण तिला त्या केंद्रावर आपला नंबर मिळाला नाही. तिथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला ती मुलगी तणावात असल्याचे दिसले. जेव्हा तिने आपल्या परीक्षा केंद्राचा पत्ता बघितला तेव्हा त्यांना कळले कि, ते केंद्र २० किलोमीटर दूर आहे म्हणूनच त्यांनी तिला आपल्या पोलीस जीपमधून सायरन वाजवून गाडीतून नेण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी ते दोघे योग्य त्या केंद्रावर पोहोचण्यात यशस्वी झाले. ही घटना गुजरातमधल्या भुजमध्ये घडली असून स्थानिक मीडिया मध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव जे. व्ही. ढोलू असे असल्याचे समजत आहे.

हे ही वाचा:

ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन

अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…

तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण

भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?

ट्विटरवर या पोस्टला आत्तापर्यंत १३,००० पेक्षा जास्त लाईक्स केले आहेत. सोशल मीडियावर त्या पोलीस अधिकाऱ्याच्या दयाळूपणाचे आणि त्यांच्या कर्तव्यदक्षतेचे किती मोठे आणि चांगले उदाहरण आहे अशी टिप्पणी एकाने केली आहे. “अधिकाऱ्याला सलाम आणि धन्यवाद” असे दुसरा म्हणाला आहे. ‘माझ्या वडिलांनी माझ्या बोर्ड परीक्षेला काही दिवस सुट्टी घेतली आणि संपूर्ण वेळ त्यांची स्कुटर घेऊन ते शाळेबाहेर उभे राहिले’ असे तिसरा म्हणाला.  गेल्याच महिन्यात कोलकत्ता येथे अशीच घटना घडली होती जेव्हा कोलकाता पोलीस अधिकारी एका तरुण मुलीच्या मदतीसाठी आले होते. जेव्हा तिला तिच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यास त्रास झाला होता. कोलकाता पोलिसांच्या अधिकृत फेसबुक पेजवर २५ फेब्रुवारी रोजी इन्स्पेक्टर सौवीक चक्रवर्ती यांची ही कहाणी शेअर केली होती.

Exit mobile version