गणपती बाप्पा आम्हाला पावणार आणि राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा विश्वास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतना व्यक्त केला. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन समाधान वाटले. पूजा केली, आरती केली. दर्शन घेतले. राज्यातील सर्व जनतेला सुखा समाधानात ठेव. बळीराजावरील सर्व संकटे दूर व्हावीत, यंदा पाउसकाळ चांगला झाला आहे. त्याच प्रमाणे लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ नागरिक यांच्या आयुष्यात समाधान, समृद्धी येउदे, त्यांच्या आयुष्यात परिवर्तन होऊदे, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा..
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ही नौटंकी !
नापाक इरादे… भारत- बांगलादेश सीमेवर आण्विक क्षेपणास्त्रे तैनात करण्याविषयी चर्चा
युपीमधून धर्मांतरासाठी नेत होते नेपाळला, हिंदू संघटनांनी काळे फासून पास्टरला लावले पळवून !
बजाज हाऊसिंग फायनान्सची दमदार एन्ट्री; ११४ टक्क्यांनी वाढला शेअरचा भावt
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गणपती बाप्पा पावेल आणि महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांच्या पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.