बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

बीड हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करतायत

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण ताकदीने काम करत असल्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी याचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले आहे की, “बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलिस पूर्ण ताकदीने काम करत आहेत. पूर्ण शक्तीने आणि निर्धाराने कारवाई सुरु आहे. या प्रकरणात काहीही झालं तरी कोणालाही वाचवलं जाणार नाही. कुणी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवलं जाणार नाही. जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोकं दादागिरी करतात, हप्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरब बसवणार आहे. त्यामुळे सगळ्यांवर योग्य कारवाई सुरु आहे,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अंजली दमानिया यांनीही त्यांची तक्रार पोलिसांना द्यावी त्यावर पोलिसांकडून निश्चित कारवाई केली जाईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आरोपी कुठेही गेले असतील आणि कुणीही त्यांना मदत केली असेल तर त्यांच्यावर कारवाई होत आहे. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडणार नाही. यासंदर्भात नीट चौकशी करु द्या, सगळी चौकशी करु होऊ द्या. कुणालाही सोडलं जाणार नाही. या प्रकरणाचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये ही के गंभीर बाब आहे.”

हे ही वाचा..

टाटा पंचने मारुतीला मागे टाकले

देशाच्या राजधानीला विकासाची गरज, ‘आप-दा’ची नाही!

हृदयद्रावक घटना : पाळीव प्राण्यांच्या दुकानात ५७९ प्राण्यांचा गुदमरून मृत्यू

बांगलादेशमध्ये हिंदू पत्रकाराच्या घरावर हल्ला

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला असून याची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी आणि देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड हा सध्या सीआयडी कोठडीत आहे. तर देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध घेतला जात होता. याला आता मोठे यश मिळाले असून तीन पैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आलीअ असून कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. आता या आरोपींनाही १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version