मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात फलाट क्र. १ वर लोकलमध्ये शिरताना पाय घसरून पडलेल्या एका तरुणीचा जीव वाचवण्यात पोलीस हवालदार अभिजीत जाधव यांना यश आले. धावत्या लोकलमध्ये शिरताना हा प्रसंग घडला. तिचा पाय लोकल आणि पटरीच्यामध्ये अडकला होता. रविवारी दुपारी ३.२० च्या दरम्यान हा प्रकार घडला. जाधव यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संबंधित तरुणी वाचली.
हेही वाचा :
ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!
ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला मविआमध्ये आता छोट्या भावाची भूमिका
कारगिल हुतात्मा वडिलांसाठी त्याने मॅनेजमेंटचा मार्ग सोडला, स्वीकारली लष्करी अकादमी
कारगिल हुतात्मा वडिलांसाठी त्याने मॅनेजमेंटचा मार्ग सोडला, स्वीकारली लष्करी अकादमी
याबाबत माहिती अशी की हवालदार जाधव हे सध्या गावदेवी पोलीस स्थानकात नेमणूकूस आहेत. एका गुन्ह्याच्या तपासासाठी ते ग्रँट रोडवरून मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये आले होते. त्याचवेळी लोकलमध्ये शिरताना संबंधित तरुणीचा पाय घसरला. फलाटावरच असलेल्या जाधव यांनी तत्काळ तिला खेचून बाहेर काढले. त्यामुळे संबंधित तरुणीचा जीव वाचला. जाधव यांच्या या प्रसंगावधनाचे फलाटावरील प्रवाशांनी कौतुक केले.