कोलकाता बलात्कार प्रकरणावरून देशभरात अजूनही संतापाची लाट आहे. आरोपीला कठोर शिक्षा आणि महिला संरक्षणासाठी पश्चिम बंगालमध्ये अजूनही डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री ममता आणि त्यांचे मंत्री मंडळ मुग गिळून गप्प आहेत. दरम्यान, महिला डॉक्टरांच्या आंदोलनावरून ममता सरकारच्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आरजी के रुग्णालयाबाहेर आंदोलनाच्या नावाखाली महिला रात्री दारू प्यायला जातात, असे विधान प्राणी संसाधन विकास मंत्री स्वपन देबनाथ यांनी केले आहे.
एका कथित व्हिडिओमध्ये टीएमसी मंत्री स्वपन देबनाथ बुधवारी (१८ सप्टेंबर) पूर्व वर्धमान जिल्ह्यात एका मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले, ‘रिक्लेम द नाईट’ आंदोलनादरम्यान मी माझ्या परिसरात पाहिले की, एका हॉटेलमध्ये रात्री महिला दारू पिण्यासाठी गेल्या होत्या. आंदोलनात सहभागी असलेल्या मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींवर लक्ष ठेवले पाहिजे.
हे ही वाचा :
‘बेस्ट’च्या कंडक्टरवर धावत्या बसमध्ये चाकूहल्ला, पैसे लुटले, मोबाईल हिसकावला!
आर्थिक संकटात सापडला मालदीव, भारताकडून ५ कोटी अमेरिकी डॉलरची मदत !
तिरुपती लाडू प्रकरण पोहोचले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे
ते पुढे म्हणाले, अशा लोकांसाठी आम्हाला रात्रीचा पहारा द्यावा लागतो. यांचे आई-वडील मुलांना काही विचारणार नाहीत, आपली मुलगी कोणत्या दारूच्या दुकानात जाते, याची या लोकांना कल्पनाच नसते. तुम्ही आंदोलन करा, मेणबत्त्या लावा, मोर्चे काढा, पण आई-वडिलांना कळणार नाही की मुलगी रात्री कुठे गेली?, असे मंत्री स्वपन देबनाथ यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी ममता सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.