सियाचीनमध्ये उभा राहिला पहिला मोबाईल टॉवर

सैनिकांना साधता येणार कुटुंबियांशी संवाद

सियाचीनमध्ये उभा राहिला पहिला मोबाईल टॉवर

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडिया ऍप एक्सवर (ट्विटर) चांगलेच ऍक्टिव्ह असतात. ते अनेकदा नवनवीन व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर टाकत माहिती देत असतात. शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी त्यांनी एक ट्विट करत एक खास बातमी दिली आहे.

जगातील सर्वात उंच युद्धभूमी अशी ओळख असलेल्या सियाचीनमध्ये पहिला मोबाईल टॉवर बसवण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आनंद महिंद्रा यांनी एक खास कॅप्शन लिहिले आहे. आनंद महिंद्रा यांनी सियाचीनचे फोटो शेअर केले आहेत. आनंद महिंद्रा यांनी लिहिलं आहे की, “आपल्या सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी दररोज आपले प्राण पणाला लावणारे सैनिक मोबाईल टॉवरमुळे आता त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले गेले आहेत. सैनिकांसाठी हे उपकरण विक्रम लँडरइतकेच महत्वाचे आहे. माझ्यासाठी ही खरोखरच खूप मोठी बातमी आहे,” असे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी पोस्टला दिले आहे.

हे ही वाचा:

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

भारतातील इस्रायली नागरीक चिंतेत!

२०२४ साठी काँग्रेसचे फोडा आणि सत्ता ओढा धोरण…

सियाचीन ग्लेशियर लडाख प्रांतात आहे. अत्यंत आव्हानात्मक अशा स्थितीत आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी तिथे तैनात असतात. सैनिकांना कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी सियाचीनमध्ये पहिला मोबाईल टॉवर बसवण्यात आला आहे. त्यामुळे ही आनंदाची बाब आहे. फोटोत दिसत असल्याप्रमाणे सैनिकांसाठी बर्फाळ प्रदेशात अनेक तंबू बांधण्यात आले आहेत. तसेच एक व्यक्ती मोबाईल टॉवरचे बांधकाम करतो आहे. काम पूर्ण झाल्यावर त्याने मोबाईल टॉवरचा एक फोटो शेअर केला आहे. अशाप्रकारे सियाचीनमध्ये पहिला मोबाईल टॉवर बसवण्यात आला आहे.

Exit mobile version