दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

साहित्यिक, रंगभूमीवरही आपला ठसा उमटवला

दूरदर्शनवरील पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन

जेष्ठ अभिनेते, लेखक, दूरदर्शनवर पहिले मराठी वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन झाले असून वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेहेंदळे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. आजारी असल्याकारणाने ते मुलीच्या घरी राहत होते. तेथेच त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुलुंड पूर्व इथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्या पार्थिवावर मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांचा जन्म १० जुलै १९३९ रोजीचा. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. त्यानंतर त्यांची मीडियासंबंधी कारकीर्द दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून सुरू झाली. दिल्ली आकाशवाणीवरून मराठी बातम्या वाचणारे ते पहिले निवेदक आणि मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदकही. मुंबई दूरदर्शनचे संचालक तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचा पदभारही त्यांनी सांभाळला. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशनचे ते संस्थापकही होते.

हेही वाचा :

समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!

सर्वोच्च न्यायालयात आज या दोन मोठ्या प्रकरणांवर सुनावणी

घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक

साहित्यिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलाय. आपले मला भेटलेली माणसे, पंतप्रधान,  नरम गरम हा कथासंग्रहासह अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. विश्वास मेहंदळे यांनी नाटकातही काम केले आहे. अग्निदिव्य, खून पहावा करून, एक तमाशा अच्छा खासा, नांदा सौख्य भरे, जर असं घडलं तर, पंडित आता तरी शहाणे व्हा, प्रेमा तुझा रंग कसा, मृत्युंजय, लग्न, स्पर्श, स्वरसम्राज्ञी, शारदा, सासूबाईंचं असंच असतं अशा नाटकांत त्यांनी भूमिका केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत मेहंदळे यांना श्रद्धांजली वाहीली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय, दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक, ज्येष्ठ संपादक, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

Exit mobile version