मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील ‘मन की बात’चा पहिला एपिसोड ३० जूनला !

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

मोदींच्या तिसऱ्या टर्ममधील ‘मन की बात’चा पहिला एपिसोड ३० जूनला !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला होता. ‘मन की बात’च्या ११० व्या कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान मोदींनी याची माहिती दिली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. येत्या ३० जून रोजी हा कार्यक्रम सुरु होणार असून पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशवासीयांशी आपले विचार मांडणार आहेत. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.

प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आता पुन्हा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत लिहिले की, ‘तुम्हाला कळविताना आनंद होत आहे की, निवडणुकीमुळे काही महिन्यांच्या अंतरानंतर ‘मन की बात’ पुन्हा एकदा येत आहे. या महिन्याचा कार्यक्रम रविवार, ३० जून रोजी होणार आहे. यासाठी तुम्ही ‘MyGov Open Forum’ किंवा ‘NaMo app’ तुमची मते शेअर करा. तुम्ही तुमचा संदेश १८०० ११ ७८०० या क्रमांकावर देखील रेकॉर्ड करू शकता, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

हेही वाचा..

वसईत तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या

नाना पटोलेंचा कार्यकर्त्यांकडून पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल; भाजपाने घेतला समाचार!

दिल्ली, पाटणासह देशातील ४० विमानतळांवर बॉम्बच्या धमकीचे ईमेल!

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल!

दरम्यान, या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे सरकारी उपक्रम, धोरणे आणि कल्याणकारी योजनांची माहिती प्रसारित करतात. २२ स्थानिक भाषा तसेच फ्रेंच, नी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाचा प्रभाव लोकांच्या जीवनावर झाला असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. १०० कोटी पेक्षा जास्त लोक मन कि बात या कार्यक्रमाशी एकदा तरी जोडले गेले आहेत.

 

Exit mobile version