मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात स्थित कुनो राष्ट्रीय उद्यानात दक्षिण आफ्रिकेतून आणल्या गेलेल्या मादी चित्ता गामिनी हिने १० मार्च रोजी पाच नव्हे तर, सहा बछड्यांना जन्म दिला आहे. वनविभागाला हा सहवा बछडा १८ मार्चला आढळून आला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी १८ मार्च रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सर्व सहा बछड्यांचे एकत्र छायाचित्रही प्रसिद्ध केले. हे सर्व बछडे निरोगी आहेत. आता कूनोमध्य १४ बछड्यांसह चित्त्यांची संख्या २७ झाली आहे.
पहिल्यांदाच माता बनलेली गामिनी ही भारताच्या भूमीवर सहा बछड्यांना जन्म देणारी पहिली मादी चित्ता ठरली आहे. आतापर्यंत कोणत्याही मादी चित्त्याने सर्वाधिक पाच बछड्यांना जन्म दिला आहे. चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२२ रोजी स्वतःच्या जन्मदिनाला नामिबियातून आठ चित्त्यांना आणून श्योपूरच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले होते. त्यातील ज्वाला चित्त्याने मार्च २०२३मध्ये चार बछड्यांना जन्म दिला होता. मात्र उष्मा आणि अशक्तपणामुळे यातील तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. त्यातील एक बछडा निरोगी असून तो लवकरच एक वर्षाचा होईल.
हे ही वाचा:
तामिळनाडूत पीएमकेची ‘एनडीए’ला साथ; भाजपासोबत युती करून जागावाटप निश्चित
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
१० मार्च रोजी गामिनीने पाच बछड्यांना जन्म दिल्याचे वृत्त आले होते. मात्र आता तिने ६ बछड्यांना जन्म दिल्याचे आढळून आले आहे. याआधी नामिबियामधून आलेल्या ज्वाला मादीने दोनदा तर, आशाने एकवेळा बछड्यांना जन्म दिला आहे.