पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!

पर्यटकांच्या लागल्या रांगा

पंतप्रधान मोदींच्या फोटोंमुळे पालटले लक्षद्वीपचे नशीब!

या वर्षीच्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती.पंतप्रधान मोदींनी त्या ठिकाणी काही फोटो देखील काढले होते.हे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आणि लक्षद्वीप बेट अचानक जास्त चर्चेत आले.पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट देण्याचेही लोकांना आवाहन केले.पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपच्या भेटीमुळे आणि आवाहनामुळे व्यापक परिणाम झाला.पर्यटन अधिकारी इम्तियाज मोहम्मद टीबी यांनीही याला दुजोरा दिला आहे.एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांना पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या परिणामांबद्दल विचारले असता. ते म्हणाले, प्रभाव खूप मोठा पडला आहे.या बेटाबद्दल लोकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

ते पुढे म्हणाले की, लक्षद्वीपला देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली आहे.हवाई कनेक्टिव्हिटी सुव्यवस्थित झाल्यावर पर्यटकांचा ओघ वाढेल, असा विश्वासही त्यांना आहे.मुंबईचे पर्यटक अमन सिंह म्हणाले, आम्हाला लक्षद्वीप खूप दिवसांपासून यायचे होते, परंतु बेटाशी संबंधित काही कारणास्तव आम्ही जात न्हवतो.मात्र, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा प्रभाव इतका पडला की, आता तिथे जाणे शक्य झाले आहे.आणखी एक पर्यटक सुमित आनंद याने सांगितले की, मला सुद्धा अनेक दिवसांपासून लक्षद्वीपला जायची इच्छा होती, मात्र पंतप्रधान मोदींचे फोटो आणि व्हिडिओ पाहून आता लक्षद्वीपला जाण्याचे ठरवले आहे.

हे ही वाचा.. 

प. बंगालमध्ये एनआयएच्या पथकावर हल्ला

फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

खेकड्यामुळे रोहित पवार अडचणीत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर भेटीचे सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते.पंतप्रधान मोदींनी समुद्रकिनाऱ्यावर मोकळ्या आकाशातील छायाचित्रे क्लीक केली होती.पंतप्रधान यांनी लक्षद्वीपला भेट देण्याचे लोकांना आवाहनही केले होते.

Exit mobile version