भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२४चे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयच्या नजरा लोकसभा निवडणुकीच्या तारखांवर होत्या. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने यूएईमध्ये होतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र बीसीसीआयने सर्व शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. आयपीएलच्या संपूर्ण हंगामाचे आयोजन भारतातच होईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकांदरम्यान आयपीएलचा हंगाम भारतातच खेळला जाण्याची ही दुसरी वेळ आहे. सन २०१९मध्ये बीसीसीआयने हे सामने भारतातच खेळवण्यास पसंती दिली होती. तर, सन २०१४मध्ये अर्धे सामने भारतात तर, अर्धे यूएईमध्ये झाले होते. सन २००९मध्ये हे सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले गेले होते. ‘आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतातच होईल. बीसीसीआय संपूर्ण वेळापत्रकावर काम करते आहे आणि लवकरच ते जाहीर केले जाईल,’ असे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
हे ही वाचा:
जमीनदोस्त केलेल्या मशिदीच्या जागी नमाज अदा करण्यास उच्च न्यायालयाने नाकारली परवानगी!
राष्ट्रीय स्वयंसेवक संलग्न सेवा भारती ट्रस्टवर ख्रिश्चन समुदायाच्या निर्मूलनाचा आरोप!
“भाजपा-एनडीए निवडणुकीसाठी तयार”
सर्वसामान्य माणसाच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप हवा कशाला? मी त्यांच्या जीवनातून सरकार बाहेर काढीन
आयपीएल २०२४च्या आतापर्यंत २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना २२ मार्च रोजी गतवेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळवला जाईल. तर, जाहीर केलेल्या वेळापत्रकातील अखेरचा सामना ७ एप्रिल रोजी आहे. आता उर्वरित वेळापत्रक लवकरच बीसीसीआय जाहीर करेल.