आदर पुनावालांनी वनिशाला संकटातून तारले

इतर संस्थानी केले हात वर, पुनावले आले मदतीला धावून

आदर पुनावालांनी वनिशाला संकटातून तारले

भोपाळ मधील वनिशा पाठकने आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे आई-वडिलांचे २०२१ छत्र हरपले. अशा बिकट संकटाच्या काळात अभ्यास करून वनिशा १० वीच्या परीक्षेत भोपाळ राज्यातून प्रथम आली होती. तसेच आता १२ वीची तयारी करून जेईई परीक्षा देण्याची तयारी करीत आहे. परंतु घराचे हफ्ते थकल्यामुळे बँकेची वारंवार नोटिस येऊ लागले. वनिशाने कित्येक वेळा पत्र व्यवहार केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी टाईम्स ऑफ इंडियाने वनिशाची दाखल घेत त्या संदर्भात बातमी दिल्यानंतर अनेक संस्थाचा मदतीचा हात पुढे आले आहेत.

वनिशाला अनेक संस्थाकडून घराचे हफ्ते फेडण्यासाठी आकर्षित खास सवलत सुद्धा देण्यात आली. परंतु वनिशाचे वय १८ पूर्ण नसल्याने तसेच कायदेशीर पालक नसल्याने कोणत्याच संस्थेने मदत करण्यासाठी तयारी दर्शवली नाही. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आणि एलआयसीला या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच नोव्हेंबरमध्ये वनिशा १८ वर्षांची झालीत आणि आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला आणि सीईओ विल्लू पूनावाला फाउंडेशन आदर पूनावाला यांच्या मार्फत वनिशा हिला घर कर्ज फेडण्यासाठी २७ लाख ४० हजार रुपये दिले आहेत. याबाबत बोलताना वनिशा म्हणाली, “माझे घर वाचवण्यासाठ केलेल्या मदतीबद्दल वनिशाने पूनावाला यांची आभार मांडले आहेत. आई-वडील गमावल्यानंतर आमच्याकडे ती शेवटची आठवण शिल्लक राहिली आहे. त्यामुळे आम्ही सदैव त्यांचे ऋणी राहू.” असे उद्गार वनिशाने केले.

हे ही वाचा:

बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला

‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’

पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका

एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला

कोविडने पालकांना हिसकावले

वनिशाची आई सीमा पाठक आणि वडील जितेंद्र पाठक यांचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वनिशाचे वडील जितेंद्र पाठक हे एलआयसीचे एजंट होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यालयातून २९ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. वनिशा सध्या १८ वर्षांची असून तिला एक लहान भाऊही आहे. वनिशासध्या मामा-मामी सोबत राहत असून आई-वडिलांच्या मृत्यूनंतर वनिशाला सरकारकडून सुमारे २ लाख रुपये मदतनिधी मिळाली असून याशिवाय दोन्ही भावंडांना शिवराज सरकारकडून दरमहा ५ हजार रुपये मिळतात.

Exit mobile version