लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेल्या पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला याचा चांगलाच फटका बसला होता. यावर शरद पवारांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली होती. अखेर निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यांनंतर शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाची गोची झाली होती. ‘तुतारी’ आणि ‘पिपाणी’ या चिन्हांमुळे मतदारांना यातील फरक न समजल्यामुळे अनेक ठिकाणी पराभव झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते.
हे ही वाचा:
खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक
विशाळ गडावरील अतिक्रमणविरोधी कारवाईला स्थगिती !
नोकऱ्यामधील आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार
पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरील खेडकर कुटुंबियांची कंपनी अनधिकृत!
याबाबत निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. शरद पवार गटाची तुतारी आणि अपक्ष उमेदवाराची पिपाणी ही चिन्हे सामान्यतः तुतारी म्हणून ओळखली जातात, असा उल्लेख शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या याचिकेत केला होता. त्यामुळे हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांच्या यादीमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे.