केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यानुसार २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहेत.राज्यसभेच्या ५६ जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत असल्याने निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत.आयोगाने म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात १५ राज्यांमध्ये ५६ राज्यसभेच्या जागा रिक्त होत असून या रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी असणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, ८ फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार असून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.त्यानंतर १६ फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल.याशिवाय उमेदवाराला आपला अर्ज मागे घ्यायचा असेल तर २० फेब्रुवारीपर्यंत ते मागे घेऊ शकतात.२७ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार व २७ तारखेलाच मतमोजणी होणार, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
हे ही वाचा:
भगव्या झेंड्यावरुन कर्नाटकात काँग्रेस-भाजप आमनेसामने!
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लांबणीवर!
राज्यात २ लाख ७६ हजार कोटींची गुंतवणूक
नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल!
Election Commission announces poll schedule for 56 #RajyaSabha seats in 15 states. pic.twitter.com/kGtIyREbxc
— All India Radio News (@airnewsalerts) January 29, 2024
महाराष्ट्रातून २०२४ मध्ये निवृत्त होणारे खासदार
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण
दरम्यान, राज्यसभेच्या या निवडणूक पार पडणार आहेत. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असून राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे.लोकसभा हे विसर्जित होते तर राज्यसभा हे कधीच विर्सजित होत नाही.परंतु,या सभागृहातील एक-तृतियांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात.२०२४ रोजी राज्यसभेतील १५ राज्यातील ५६ सदस्य निवृत्त होत आहेत.या रिक्त जागांसाठी २७ फेब्रुवारीला निवडणूका होणार आहेत.