कुत्र्याने ९ पिल्लानां जन्म दिला, मालकीनने दिली ४०० लोकांना पार्टी!

उतर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील घटना

कुत्र्याने ९ पिल्लानां जन्म दिला, मालकीनने दिली ४०० लोकांना पार्टी!

कुत्र्याने ९ पिल्लानां जन्म दिल्याच्या आनंदात कुत्र्याच्या मालकीनने तब्बल ४०० लोकांना पार्टी दिली आहे.कुत्र्याची छठी थाटामाटात साजरी करत संपूर्ण गावाला जेवण दिले.एवढेच नाहीतर गावातील महिलांनी या सोहळ्यात गाणीही म्हटल्या.कुत्रीचे नाव ‘चटणी’ असे आहे.

उतर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे.येथे एका पाळीव कुत्र्याने ९ पिल्लानां जन्म दिल्याने त्याच्या आनंदात कुत्र्याच्या मालकीनने संपूर्ण गावाला गावजेवण घातले.तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना देखील पाहुणचारासाठी आमंत्रित करण्यात आले होते.पाहुणचारासाठी पुरी, भाजी, भट आणि मिठाई ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमात ढोल ताशासह महिला सोहर गीत गात होत्या.हा सोहळा परिसरात एक चर्चेचा विषय ठरत आहे.

हे ही वाचा:

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

बीएमडब्ल्यू हॉटेलमध्ये घुसली, ऑस्ट्रेलियातील पाच भारतीय वंशाचे नागरीक मृत

हमीरपूर जिल्ह्यातील मेरापूर शहराच्या वॉर्ड क्रमांक १० मध्ये राहणाऱ्या कुत्र्याची मालकीण राजकलीने ‘चटणी’ नावाची कुत्री पाळली होती.चटणीने गेल्या आठवड्यात वेगवेगळ्या रंगाच्या अशा नऊ पिल्लांना जन्म दिला.या आधी जन्मलेली कुत्र्याची पिल्ले मोठी झाल्यावर घर सोडून निघून गेली.मात्र, चटणीने मालकीण राजकलीचे घर सोडले नाही.राजकलीने सांगितले की, जेव्हा पासून हा कुत्रा घरात ठेवला तेव्हा पासून तिच्या अनेक संशय दूर झाल्या आहेत. चटणीने एकाच वेळी नऊ पिल्लाना जन्म देण्याचे हे तिसरे वर्ष आहे.साधारणपणे पाहायला गेलं तर कुत्रा चार ते सहा पिल्लाना जन्म देऊ शकतो.

दरम्यान, बुधवारी सायंकाळपासूनच पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरु झाली होती.या मेजवानीत चारशेहून अधिक लोक सहभागी झाले होते.रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा सुरु
होती.काही महिलांनी चटणी सोबत सेल्फीही काढले.

Exit mobile version