विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद मिटला

गेल्या आयपीएल हंगामात बेंगळुरूचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि कोलकात्याचा टीम मेंटॉर गौतम गंभीर यांच्यात वाद झाला होता. मात्र यंदा हा वाद मिटल्याची चिन्हे दिसत आहेत. या दोघांनी बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडिअमवर एकमेकांशी हस्तांदोलन करून एकमेकांना मिठी मारल्यामुळे तशी शक्यता वर्तवली जात आहे.

पहिल्या इनिंगमध्ये टाइम-आऊटदरम्यान त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. या सामन्यात कोहली याने ५२ वे आयपीएल अर्धशतक ठोकले. आयपीएलच्या २०२३च्या हंगामात लखनऊविरोधातील सामन्यात कोहली आणि गंभीरमध्ये वाद झाला होता. अर्थात दोघांमध्ये वाद उद्भवण्याची ही काही पहिली वेळ नव्हती.

सन २०१३मध्ये जेव्हा गंभीर कोलकात्या कर्णधार होता आणि कोहली बेंगळुरूचे प्रतिनिधीत्व करत होता, तेव्हाही दोघांमध्ये वाद झाले होते. तसेच, त्यावेळी दोघांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली होती. तेव्हा दोघांच्या संघांमधील खेळाडूंनी मध्यस्थी करून हे भांडण सोडवले होते.

सन २०२३मध्ये कोहली याचे लखऊनमधून खेळणाऱ्या अफगाणिस्तानच्या नवीन-उल-हक या गोलंदाजाशी भांडण झाले होते. सामना संपल्यानंतर गंभीरने कोहलीशी संवाद साधून नका, असे आवाहन केले होते आणि लखनौच्या खेळाडूंनी रोखण्यापूर्वी कोहलीवर आरोपही केले. सामन्यानंतर, गंभीरने आपल्या कोणत्याही खेळाडूचा बचाव करेन, असे सांगून आपल्या कृतीचे समर्थन केले आणि सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय असलेले खेळाडू इतर खेळाडूंवर अरेरावी करू शकत नाहीत, असे वक्तव्य केले होते.

‘हा केवळ नवीन-उल-हकचा प्रश्न नव्हता. मी माझ्या कोणत्याही खेळाडूचा बचाव केला असता. ते माझे कामच आहे. मी असाच आहे. केवळ कोणता तरी ब्रॉडकास्टर त्याच्यासाठी काम करतोय म्हणून मी माझ्या खेळाडूंचा बचाव करू नको का? सोशल मीडियावर अधिक लोकप्रिय असलेल्या खेळाडूंना इतरांवर अरेरावी करण्याचा अधिकार नाही,’ असे वक्तव्य तेव्हा गंभीर यांनी केले होते.

हे ही वाचा:

व्याभिचारी महिलेला सार्वजनिकरीत्या दगडाने ठेचून मारणार

भारतीय नौदलाचा पुन्हा चाच्यांशी संघर्ष; अपहृत जहाजावरील २३ पाक कर्मचाऱ्यांची सुटका

बेंगळुरू कॅफे स्फोट; दोन संशयितांची माहिती देणाऱ्यास २० लाखांचे बक्षीस जाहीर

“मविआमधून आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला”

कोहली याचे आयपीएलमधील ५२वे अर्धशतक

विराट कोहली याने शुक्रवारी त्याचे आयपीएल हंगामातील ५२वे शतक ठोकले. हे शतक ठोकून कोहलीने हैदराबादचा यष्टीरक्षक हेन्रिच क्लासेन याला सर्वाधिक धावसंख्येत मागे टाकले आहे. तो बेंगळुरूसाठी सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाजही ठरला आहे. यात त्याने एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकले.

Exit mobile version