तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

भारतीय तटरक्षक दलांबरोबरच लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून ध्रुव हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. पण ध्रुव हे अत्याधुनिक हलक्या वजनाच्या श्रेणीतील हेलिकॉप्टर आहे. पण आता संरक्षण दलाने ध्रुवच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. ध्रुव हेलिकॅप्टरचा वापर न करण्याचा निर्णय संरक्षण दलाने घेतला आहे. मुंबई किनारपट्टीवर ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या अपघाताचे कारण शोधून काढेपर्यंत आणि या प्रकरणाचा सर्व प्रकारचा तपास पूर्ण होईपर्यंत ध्रुव हेलिकॉप्टरचा वापर थांबवण्यात आला आहे. त्यामुळे तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ध्रुव हे प्रगत हेलिकॉप्टर विकसित केले आहे. हे हेलिकॉप्टर पूर्णपणे भारतीय बनावटीचे असून त्यांचा वापर शस्त्रे, साहित्य, कर्मचारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जातो..या अपघाताच्या संदर्भात आधीच पावले उचलली आहेत. ध्रुव पुन्हा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. लवकरच ध्रुव कार्यरत होईल असा विश्वास संरक्षण अधिकाऱ्यांनी व्यक्त आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

मुश्रीफ यांच्या घरावरील छाप्यानंतर भावनेला महापूर

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

हिंदू मंदिरांवर हल्ले,ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिला हा दिलासा

काही दिवसांपूर्वी नौदलाच्या एका हेलिकॉप्टरने मुंबईच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात पाण्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते . सुदैवाने या अपघातात क्रू मेंबर्स भाचवले .नौदलाच्या एका हेलिकॉप्टरने मुंबईच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात पाण्यावर आपत्कालीन लँडिंग केले. मात्र, क्रू मेंबर्स वाचले ही दिलासादायक बाब आहे. ध्रुवने मुंबईतून नियमित उड्डाण केले होते. पण अचानक या हेलिकॉप्टरचे पाण्यावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. तात्काळ शोध आणि बचाव मोहिमेमुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने तीन क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली .

Exit mobile version