नाईट क्लबचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १८४ लोकांचा मृत्यू!

बचावकार्य सुरुच, जखमींना रुग्णालयात दाखल

नाईट क्लबचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत १८४ लोकांचा मृत्यू!

उत्तर अमेरिकन खंडातील कॅरिबियन प्रदेशात असणाऱ्या डोमिनिकन रिपब्लिक देशाची राजधानी सॅंटो डोमिंगोमध्ये एका नाईट क्लबचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत किमान १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी अपघातात शेकडो इतर लोक जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री (८ एप्रिल) ही दुर्घटना घडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की,  प्रसिद्ध मेरेंग्यू गायिका रुबी पेरेझ नाईट क्लबमध्ये परफॉर्म करत असताना नाईटक्लबच्या छतावरून सिमेंट पडू लागले आणि काही सेकंदातच संपूर्ण छत कोसळले. या अपघातात गायिका रुबी पेरेझचाही मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छत कोसळल्याने डान्स फ्लोअरवर नाचणाऱ्या किमान १८४ लोकांचा मृत्यू झाला, तर डझनभर लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात शेकडो लोक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे प्रमुख मॅन्युएल मेंडेझ म्हणाले की, बचाव पथके ढिगाऱ्यातून अजूनही जिवंत असलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. ते पुढे म्हणाले, आम्ही ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत फक्त ५४ लोकांची ओळख पटली आहे.

हे ही वाचा : 

तहव्वुर राणाला काय शिक्षा व्हावी ?

अरविंद सावंत, वर्षा गायकवाड गद्दार!

आयात शुल्कावरील स्थगिती जाहीर होताचं आशियाई शेअर बाजारांमध्ये तेजी!

दहशतवादी राणाच्या विरोधात नरेंद्र मान यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती

अधिकाऱ्यांनी सांगितले की, २८ मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. ढिगाऱ्यातून १४५ जणांना वाचवण्यात आले आहे आणि त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी प्यूर्टो रिको आणि इस्रायलमधील बचाव पथके देखील डोमिनिकन रिपब्लिकमध्ये पोहोचली आहेत.

नाईट क्लबचे छत कोसळण्याचे कारण सध्या स्पष्ट झालेले नाही. ‘जेट सेट नाईट क्लब’ इमारतीची शेवटची तपासणी कधी झाली याचीही माहिती नाही. नाईटक्लबने एक निवेदन जारी करून सांगितले की ते अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत. राष्ट्रपती लुईस अबिनाडर यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

मग तुम्ही आमदार असून उपयोग काय ? | Mahesh Vichare | Amit Gorkhe | Devendra Fadnavis | Eknath Shinde

Exit mobile version