गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू

बुधवारी सायंकाळी समुद्रात सोडलेलं व्हेलचे पिल्लू पुन्हा किनाऱ्यावर

गणपतीपुळे येथे जीवनदान दिलेल्या ‘त्या’ व्हेलच्या पिल्लाचा मृत्यू

रत्नागिरीमधील गणपतीपुळे येथे समुद्रकिनारी एक बेबी व्हेल वाहत पोहचला होता. भरतीच्या वेळी आलेलं हे व्हेल माशाचे पिल्लू ओहोटीच्या वेळी वाळूत रुतून अडकून पडले होते. अडकलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाला अखेर ४० तासांनी समुद्रात पुन्हा सोडण्यात यश आले होते. ४० तासांपासून सरकारच्या विविध यंत्रणा व्हेल माशाच्या पिल्लाला जीवदान मिळवून देण्याकरिता प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. पण दुर्दैवाने हे पिल्लू बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा किनाऱ्यावर आले आणि तेव्हा या बेबी व्हेल माशाचा मृत्यू झाला.

व्हेल माशाच्या या पिल्लाला दोन दिवसांत जवळपास पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल बुधवारी संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारी आला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल 13 नोव्हेंबर रोजी सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. खोल समुद्रातील बेबी व्हेल भरकटला आणि गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आला. आकाराने मोठ्या असलेल्या बेबी व्हेलला पुन्हा समुद्रात पाठविण्यासाठी सरकार, स्थानिकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर ४० तासांनंतर या प्रयत्नांना यशही आलं होतं. पण, पुन्हा एकदा बेबी व्हेल किनाऱ्यावर आला आणि अखेर त्याला मृत्यूने गाठलं.

हे ही वाचा:

शमीने भारताला दाखवला अंतिम फेरीचा मार्ग

जम्मू- काश्मीरमधील सैनिकांसोबत स्थानिक महिलांनी साजरी केली भाऊबीज

पंतप्रधान मोदींच्या गाडीसमोर महिलेने घेतली उडी

जम्मू- काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून अपघात; ३० ठार

दरम्यान, व्हेलला जीवदान देण्यासाठी कपड्यांनी झाकून ठेवून त्यावर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला होता. तीन जेसीबी, टग आणि बोटींच्या सहाय्याने व्हेलला समुद्रात सोडण्यात यश आले होते. त्यामुळे ‘ऑपरेशन व्हेल’ चाळीस तासांनी यशस्वी झालं असं समजलं जात होतं. मात्र, आता या पिल्लाचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version