शेतकऱ्यांच्या आंदोलनात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू!

आतापर्यंत तीन पोलिसांचे झाले निधन

शेतकऱ्यांच्या आंदोलनात तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू!

शेतकरी आंदोलनात कर्तव्यावर असलेल्या आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.हरियाणा पोलिस उपनिरीक्षक विजय कुमार असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून विजय टोहाना सीमेवर त्यांची ड्युटी लागली होती.याच दरम्यान त्यांची प्रकृती अचानक खालावली अन त्यांचा मृत्यू झाला.या आंदोलनात आतापर्यंत तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांच्या मृत्यूबद्दल पोलीस महासंचालकांनी शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ड्युटीवर असताना पोलिस उपनिरीक्षक विजय कुमार यांची प्रकृती अचानक खालावली.यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, त्यांचा मृत्यू झाला.पोलिस उपनिरीक्षक विजय कुमार हे ४० वर्षांचे होते.हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि हरियाणा पोलीस त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अभिनेत्री विद्या बालन चे बनावट खाते तयार करून फसवणूक!

कल्याण रेल्वे स्थानकातून डिटोनेटर्सचा साठा जप्त!

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

भारत आणि चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठक पार पडली!

दरम्यान, याआधी हरियाणा पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला होता.१६ फेब्रुवारी रोजी शंभू सीमेवर तैनात असलेले जीआरपीचे उपनिरीक्षक हिरालाल यांची प्रकृती बिघडली.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा मृत्यू झाला.दुसऱ्या घटनेत, २० फेब्रुवारी रोजी अंबाला येथील शंभू सीमेवर तैनात असलेले पोलीस अधिकारी कौशल कुमार यांची देखील अचानक प्रकृती बिघडली अन त्यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version