पाच महिन्यानंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. अतिक्रमण विरोधात झालेल्या राड्यानंतर गडावर संचारबंदी लावण्यात आली होती. अखेर ही संचारबंदी उठवण्यात आली आहे. यासह गडावर मांसाहार करण्यास आणि सायंकाळी ५ वाजल्यानंतर थांबण्यास मनाई करण्यात आली आहे.
विशाळ गडावरील अतिक्रमण काढण्याविरोधात जुलै महिन्यात मोठा हिंसाचार झाला होता. हिंसाचारानंतर संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तब्बल ५ महिन्यानंतर ही संचारबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता गडावर जाता येणार आहे. मात्र, काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत पर्यटकांना गडावर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. गडावर कोणत्याही प्रकारचे मांस घेवून जाता येणार नाही अशी अटही घालण्यात आली आहे.
दरम्यान, विविध हिंदू संघटना आणि शिवभक्तांच्या मागणीनंतर प्रशासनाने विशाळ गडावरील वाढलेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पावसाळ्यात अतिक्रमणाविरोधात कारवाई कशाला? असा सवाल मुंबई हाय कोर्टाने राज्य सरकारला विचारत गडावरील अतिक्रमणाविरोधात सुरु करण्यात आलेल्या कारवाईला स्थगिती दिली होती. त्यामुळे गडावरील उर्वरित अतिक्रमणावर केव्हा कारवाई करण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हे ही वाचा :
आसाम: कोळसा खाणीत अडकलेल्या ९ कामगारांपैकी एकाचा मृत्यू!
पवारांचा टाहो ! लोकप्रतिनिधींना वाचवा हो…