हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारला!

भाजप आमदार अतुल भातखळकर यांचे ट्वीट

हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारला!

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु झालेला हिंसाचार तूर्तास शांत झालेला दिसतो, मात्र अनेक भागातून अधून-मधून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. या हिंसाचारात कट्टर वाद्यांकडून अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आले, विशेषतः हिंदूंना. या आरक्षणाच्या आंदोलनानंतर शेख हसिना यांना देश सोडून पळ काढावा लागला होता. यानंतर देशाची सूत्रे मोहम्मद युनूस यांच्याकडे आली. मात्र, परिस्थिती आहे तशीच आहे. दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचारामुळे भारताला उद्योग क्षेत्रात मोठा फायदा झाला आहे. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत, हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे एवढे निश्चित असल्याचे म्हटले आहे.

बांगलादेशच्या निर्यातीत वस्त्रोद्योग क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. येथून तयार झालेले कपडे भारतासह जगात अनेक ठिकाणी निर्यात होतात. मात्र, बांगलादेशात झालेल्या हिंसाचाराचा फटका तेथील उद्योगांवर बसला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय खरेदीदार भारतासारख्या पर्यायी बाजारपेठेकडे वळले असून भारताला याचा मोठा फायदा होताना दिसत आहे. त्यामुळे भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राला पुन्हा उदयास येण्याची संधी मिळाली आहे.

हे ही वाचा : 

वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट

पाकिस्तान झिंदाबाद म्हणणाऱ्या फैजानची गुर्मी उतरली, आता भारतमाता की जय, तिरंग्याला सलामी!

अभिनेता दर्शनने मागितला जामीन

सरकारी आकडेवारीनुसार, भारतीय वस्त्रोद्योगाला गती मिळाली असून गेल्या ६ महिन्यांत त्यात ६० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे, त्यामुळे भारताची आयात वाढली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, जागतिक अनिश्चितता असूनही, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एप्रिल-सप्टेंबर दरम्यान देशाची कापड निर्यात ८.५ टक्क्यांनी वाढून $७.५ अब्ज म्हणजेच ६० हजार कोटी रुपये झाली आहे. यावरून भाजप आमदार यांनी ट्वीट केले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले, बांगलादेशातील राजकीय हिंसाचारानंतर भारतीय वस्त्रोद्योगाला गती मिळाली असून गेल्या ६ महिन्यांत त्यात ६० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. बांगलादेशातील वाढत्या संकटामुळे जगभरातील कपडे खरेदीदार भारताकडे वळत आहेत, त्यामुळे भारताची निर्यात वाढली आहे. हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे एवढे निश्चित.

Exit mobile version