२३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार

२३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार

लोकसभेचे विशेष अधिवेशन पार पडले असतानाच आता १८ व्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे. मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामन्यांना काय मिळणार याकडे लक्ष असणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. १८ लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. यामध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली गेली. लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. संसदेचे हे अधिवेशन २२ जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ मध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा करेल अशी शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. देशात लोकसभा निवडणूक होणार असल्यानं अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. निर्मला सीतारमण यांच्यावर पुन्हा अर्थमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.

हे ही वाचा:

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारतापाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!

तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. त्या मोरारजी देसाईं यांना मागे टाकणार आहेत. देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते. संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या होत्या की, अर्थसंकल्पात अनेक मोठे सामाजिक आणि आर्थिक निर्णय घेतले जातील. त्यामुळे या अर्थसंकल्पावर विशेष लक्ष असणार आहे.

Exit mobile version