22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषआता बुलेट ट्रेन 'या' वर्षी धावताना दिसेल

आता बुलेट ट्रेन ‘या’ वर्षी धावताना दिसेल

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेनबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात बुलेट ट्रेन किती दिवस धावणार हे त्यांनी सांगितले आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले हेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बुलेट ट्रेनसाठी जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे. याशिवाय १९९ स्थानके जागतिक दर्जाची बनवण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

या मास्टर प्लॅन अंतर्गत अहमदाबाद रेल्वे स्थानकालाही जागतिक दर्जाचे बनवण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. बुलेट ट्रेनच्या या घोषणेसोबतच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालय रेल्वेत प्रवास करणाऱ्या लोकांना अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत ६,१०५ रेल्वे स्टेशनवर लोकांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वायफायची सुविधा बर्‍यापैकी सुरक्षित आणि वेगवान असल्याचं त्यांनी सांगितले

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना दिलेल्या ४ हजार ६८२ प्रतिज्ञापत्रावर बनावट रबर स्टॅम्पचा वापर

अरुण गोविल काय म्हणाले ‘आदिपुरुष’ बद्दल

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

बुलेट ट्रेन चालवण्याचे पंतप्रधान मोदी यांचे महत्वाकांक्षी स्वप्न आहे . २०१४ मध्ये केंद्रात मोदींचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून त्यावर काम सुरू झाले होते. आता २०१९मध्ये पुन्हा मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधानांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला वेग देण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात बनवल्या जाणार्‍या इतर बुलेट ट्रेनचा वेग ताशी २५० ते ४०० किमी असण्याची अपेक्षा आहे. परदेशात बुलेट ट्रेनमध्ये ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याच पद्धतीने भारतात तयार होत असलेल्या स्वदेशी बुलेट ट्रेनमध्ये प्रत्येक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामुळे देश बुलेट ट्रेनमध्ये स्वावलंबी होऊ शकेल. ही देशासाठी मोठी उपलब्धी असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा