कॉंग्रेस-समाजवादी पक्षातील युती संपुष्टात

मुरादाबादच्या जागांवरून बिनसलं

कॉंग्रेस-समाजवादी पक्षातील युती संपुष्टात

काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या जागावाटपाची चर्चा आता होणार नाही. उत्तर प्रदेशमधील कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील ही युती आता संपुष्टात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा झालेल्या वाटाघाटीत मुरादाबाद विभागातील तीन महत्वाच्या जागांच्या वाटपावरून मतभेद झाले. त्यामुळे ही युती तुटली.

काँग्रेससोबत जागावाटपाचा करार होईपर्यंत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत समाजवादी पक्ष सहभागी होणार नाही, असे सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी स्पष्ट केल्यानंतर युती तुटल्याची घटना घडली आहे. जागावाटपाच्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा सुरु होती. बहुतेक जागांवर दोन्ही बाजूकडून एकमत व्हावे अशी भावना होती. मात्र मुरादाबाद च्या संदर्भाने हि चर्चा थांबली. काँग्रेसने समाजवादी पक्षाकडून बिजनौरची जागाही मागितली होती.

हेही वाचा..

अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड

पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

झारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

मात्र त्याला समाजवादी पक्ष तयार नाही. त्यामुळे संभाव्य युती तुटली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांच्या पक्षाने काँग्रेससोबत वादग्रस्त जागा वगळता १७ जागांवर करार केला होता. मान्य झालेल्या जागांमध्ये अमेठी, रायबरेली, वाराणसी, प्रयागराज, देवरिया, बांसगाव, महाराजगंज, बाराबंकी, कानपूर, झांसी, मथुरा, फतेहपूर सिक्री, गाझियाबाद, बुलंदशहर, हाथरस, सहारनपूर या हाय-प्रोफाइल मतदारसंघांचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांना एकाच आघाडीत एकत्र करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंडी आघाडीत ही युती तुटल्याने धक्का बसला आहे.

Exit mobile version